Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

लाखापूर (फॉ). येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा

 लाखापूर (फॉ). येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा

मुख्याध्यापक योगेश पाटील यांनी शरीर आणि मन यांच्यातील सहसंबंध सांगत विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग गुरु विनोद राणे यांनी विविध आसने तसेच प्रात्यक्षिकातून  पटविले योगाचे महत्त्व...

           तळोदा तालुक्यातील लाखापूर फॉरेस्ट येथील माध्यमिक विद्यालयात मोठ्या उत्साहात शिस्तबद्धपणे आणि आनंदमय वातावरणात 11वा जागतिक योग दिवस मुख्याध्यापक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी मुख्याध्यापक योगेश पाटील यांनी योगाचे महत्व तसेच मन आणि शरीर यातील सहसंबंध सांगत विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधून योगाच्या शास्त्रीय बाजूचे विवेचन केले. त्यांनी सांगितले की, "योग ही केवळ शारीरिक क्रिया नसून, ती मन, शरीर आणि आत्मा यांचा समन्वय साधणारी शिस्त आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात योग केल्याने तणावमुक्त जीवन जगता येते." तसेच जागतिक योगदिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी योगगुरू विनोद राणे यांनी विविध योगासने व प्रात्यक्षिक करून दाखवले.

यानंतर सर्व विद्यार्थी व शिक्षक यांच्याकडून योगाची विविध आसने करून घेतली. आसनात ग्रीवाचलन, स्कंद  खीचाव, कटी शक्ती संचालन , घुटना संचालन, ताडासन , वृक्षासन, अर्ध चक्रासन , त्रिकोणासन , दंडासन , भद्रासन , वज्रासन, शशिकासन,कपालभाति ,भ्रामरी, भुजंगासन,  शवासन, प्राणायाम ,अनुलोम विलोम  ,ध्यान धारणा ओमकार धुन , आसन मानेच्या हालचाली, हाताच्या हालचाली, पायाच्याहालचाली,  सूर्यनमस्कार इ. प्रकार करून घेतले. सर्व विद्यार्थ्यांनी आनंदाने योगासने केली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवत मॅट देखील  आणल्या होत्या. योग गुरु विनोद राणे, यांनी विविध प्रकारचे योगासने सादर करून उपस्थित विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना योगाभ्यासाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी शारीरिक व मानसिक आरोग्यातील संतुलनाचे महत्त्व समजावले. आणि योगाच्या नियमित सरावाने मन:शांती व आरोग्य दोन्ही प्राप्त होऊ शकते, हे उलगडून सांगितले.तसेच विद्यार्थ्यांना योगाचे आपल्या जीवनातील महत्त्व, फायदे सांगितले नियमित योग अभ्यास केल्याने आपली स्मरणशक्ती वाढण्यास  मदत होते याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी योगाभ्यासात सहभागी होऊन योग दिनाचा अनुभव घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयी जागरूकता वाढली असून, सर्वांनी नियमित योग सरावाचा संकल्प केला.

जागतिक योग दिवस यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक योगेश पाटील, उपशिक्षक संजय पाटील, विनोद राणे, मंगल पावरा, चंदू पाडवी , फिरोजअली सय्यद, अनिल भामरे , सुवर्णा कोळी, विजय पवार,  सागर पाडवी  योग दिनाचे परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments