Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

तोरणमाळ होमस्टे विकासाबाबत जिल्हाधिकारींची तातडीची बैठक आणि पाहणी ; दर्जेदार पर्यटनासाठी ठोस पावले

 तोरणमाळ होमस्टे विकासाबाबत जिल्हाधिकारींची तातडीची बैठक आणि पाहणी ; दर्जेदार पर्यटनासाठी ठोस पावले

  तोरणमाळ येथे होमस्टे प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत महत्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने होमस्टे प्रकल्प हा महत्त्वाचा असून, या संदर्भात काम करणाऱ्या विविध यंत्रणांना बैठकिला हजर राहण्याचे निर्देश दिले होते.

होमस्टे प्रकल्पावर थेट पाहणी:

बैठकीनंतर जिल्हाधिकारी यांनी तोरणमाळ येथील चार होमस्टे युनिट्सची पाहणी केली. यावेळी गुणवत्तेतील त्रुटींवर नाराजी व्यक्त करून कंपनीला दुरुस्तीचे स्पष्ट आदेश देण्यात आले. कामात सुधारणा केल्याशिवाय कोणतेही देयक अदा केले जाणार नाही, हे देखील स्पष्ट करण्यात आले.

 अनुपस्थित अधिकारी व निष्काळजीपणाबाबत नाराजी:

सार्वजनिक बांधकाम विभाग, शहादा यांचा एकही प्रतिनिधी बैठकीला अनुपस्थित राहिल्याने जिल्हाधिकारी महोदयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

रस्ते, वीज आणि पाणी सुविधा:


⦁  होमस्टेपर्यंत जाणारा रस्ता जिल्हा नियोजन आराखड्यातून मंजूर असून, कनिष्ठ अभियंत्यांमार्फत ६ महिन्यांत पूर्ण होईल, असे सांगण्यात आले.

⦁  पाणी आणि वीज कनेक्शनच्या अभावावरही चर्चा झाली. माविम आणि संबंधित यंत्रणांना तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले.



स्थानिक नागरिकांच्या तक्रारी:

⦁  पाणीपुरवठा करणारा फिल्टरेशन प्लांट सुरु न झाल्याची तक्रार.

⦁  आधार कार्ड नोंदणी होत नसल्याचा प्रश्न मांडण्यात आला.

→ यावर १४ जून रोजी आधार नोंदणी शिबिर आयोजित करण्याचे आदेश तहसीलदार अक्राणी यांना देण्यात आले.



आगामी संयुक्त आढावा बैठक:

तोरणमाळ पर्यटन विकासासाठी आवश्यक सहा प्रमुख विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील, अशा संयुक्त आढावा बैठकीचे आयोजन जुलै २०२५च्या पहिल्या आठवड्यात तोरणमाळ येथे होणार आहे. या बैठकीपूर्वी सर्व यंत्रणांशी जिल्हाधिकारी थेट चर्चा करतील असे आदेश देण्यात आले आहेत.


पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक विकास व रोजगाराला चालना देणे हे उद्दिष्ट असून, तोरणमाळ हे पर्यटन क्षेत्र दर्जेदार सोयीसुविधांसह विकसित करणे जिल्हा प्रशासनाचे प्रमुख धोरण ठरणार आहे.

.

.

.

#NandurbarTourism #ToranmalsTransformation #HomeStayDevelopment #DistrictAdministrationNandurbar #Toranmal #SustainableTourism #CollectorVisit #TourismWithPurpose

Post a Comment

0 Comments