झोमॅटो फिडींग इंडिया अंतर्गत अंगणवाडी सुधार प्रकल्प तळोदा तालुक्यात अभिनव उपक्रमाची सुरुवात!
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील 26 अंगणवाड्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झोमॅटो फिडींग इंडिया या सामाजिक उपक्रमांतर्गत घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचे नेतृत्व आमदार राजेश पाडवी आणि जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
प्रायोगिक तत्वावर सुरू होणाऱ्या या उपक्रमात अंगणवाड्यांमध्ये बालकांचे पोषण, शिक्षण आणि मूलभूत सुविधा या तिन्ही अंगांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे.
या उपक्रमात सुसज्ज अंगणवाडी भवनाचे बांधकाम सुरक्षित, स्वच्छ आणि आकर्षक वास्तू उभारली जाणार. कॉन्ट्रॅक्टर व इंजिनियर नियुक्ती बांधकामाची गुणवत्ता आणि नियोजन सुनिश्चित करण्यासाठी. 2026 पासून सर्व बालकांना पोषणमूल्ययुक्त दोन वेळचा आहार – Centralised Kitchen उभारण्यात येणार, जेथे गरम, पोषणयुक्त अन्न तयार होईल.
कुपोषण निर्मूलनासाठी विशेष प्रयत्न – आहार नियोजनातून मुलांचे आरोग्य सुधारण्याचा उद्देश. वीज, पाणी, स्वच्छतागृह यांसारख्या मूलभूत सुविधा – अंगणवाडीतील सर्व यंत्रणा अद्ययावत केल्या जाणार. वीज बिलाची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे – ग्रामसेवक व सरपंच यांची सक्रिय भूमिका अपेक्षित. शैक्षणिक चित्रकला, साहित्य व खेळणी यांचा समावेश – मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक व क्रियाशील वातावरण तयार होणार. सर्व सुविधांची जबाबदारी झोमॅटो फिडींग इंडिया कडे – पुढील १० वर्षे झोमॅटोच्या मदतीने सेवा अखंड सुरू राहणार. भविष्यात संपूर्ण जिल्ह्यात विस्तार – यशस्वी अंमलबजावणीनंतर हा प्रकल्प इतर तालुक्यांमध्ये देखील राबवण्यात येणार आहे. या महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे.
ही योजना केवळ एक सेवा नव्हे, तर भविष्यातील सक्षम पिढी घडविण्याचा ठोस प्रयत्न आहे. नंदुरबार जिल्हा प्रशासन आणि झोमॅटो फिडींग इंडिया यांच्यातील सहकार्यामुळे ग्रामीण भागातील बालकांना गुणवत्तापूर्ण आहार व शिक्षण मिळून त्यांचे शारीरिक आणि बौद्धिक आरोग्य सशक्त होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
.
.
.
#ZomatoFeedingIndia #AnganwadiReform #Nandurbar #ChildWelfare #PoshanAbhiyan #TalodaDevelopment #NandurbarDistrict #DistrictAdministrationNandurbar #SmartAnganwadi #NutritionFirst #TransformingRuralIndia
Post a Comment
0 Comments