अक्कलकुवा न्यायालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
अक्कलकुवा :- आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून आज दिनांक २१ जून २०२५ रोजी अक्कलकुवा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय परिसरात योग सत्राचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास न्यायाधीश मा. व्ही. बी. शितोळे, अक्कलकुवा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. संग्राम पाडवी, सचिव अॅड. रुपसिंग वसावे, खनिजदार अॅड. गजमल वसावे, अॅड.जितेंद्र वसावे, अॅड.राज नाईक रुपसिंग तडवी, अॅड.विजेंद्र नाईक, मयूर पाटील, राजेश वळवी, सुभाष नाईक (बेलीफ), किशोर बाविस्कर (बेलीफ), सिद्धांत मन्साराम मुलझिर (PLV), ईश्वर वळवी, चिंतामण ठाकरे, विनेश पाडवी, मुकेश मेश्राम,यांच्यासह वकील व न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
योग सत्रामध्ये योग प्रशिक्षक लोकेश मिलमिले, रोशन वळवी, जितेंद्र हिरे यांनी मार्गदर्शन केले. विविध योगासने, प्राणायाम व ध्यानधारणा सत्रामधून उपस्थितांना योगाचा मानसिक व शारीरिक आरोग्यावर होणारा सकारात्मक प्रभाव समजावून सांगितला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अक्कलकुवा वकील संघटनेच्या सदस्यांनी तसेच न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.
या निमित्ताने उपस्थितांनी दररोज नियमितपणे योगाभ्यास करण्याचा संकल्प केला.
"योग हा फक्त व्यायाम नव्हे तर मन, शरीर आणि आत्म्याचा समतोल साधणारी जीवनशैली आहे," असे न्यायाधीश मा. व्ही. बी. शितोळे यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे आणि उपस्थितांचे अक्कलकुवा वकील संघाचे सचिव अॅड. रुपसिंग वसावे यांनी विशेष आभार मानले.
कार्यक्रमानंतर सर्वांनी एकत्रितपणे सामूहिक छायाचित्र काढून योग दिनाचा उत्साहात साजरा केला.
Post a Comment
0 Comments