Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

नंदुरबार नगर परिषदेच्या "आधार बेघर निवारा केंद्र" ला राज्यस्तरीय गौरव!

  नंदुरबार नगर परिषदेच्या "आधार बेघर निवारा केंद्र" ला राज्यस्तरीय गौरव!

                   नंदुरबार:- राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियानांतर्गत नंदुरबार नगर परिषदेमार्फत शहरातील बेघर व्यक्तींकरिता सर्व मूलभूत सुविधांनी सुसज्ज असे "आधार बेघर निवारा केंद्र" यशस्वीरित्या कार्यान्वित आहे.

             नंदुरबार येथील खोडाई माता मंदिराच्या मागे, ट्रक टर्मिनलजवळ सध्या येथे १० लाभार्थी सुरक्षित व सन्मानपूर्वक निवास करीत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र शासनाच्या Social Audit मध्ये राज्यातील एकूण ८७ निवाऱ्यांपैकी उत्कृष्ट ठरलेले निवाऱ्यांपैकी नंदुरबारचे हे निवारा केंद्रही मानकरी ठरले आहे.  ही नंदुरबारकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे!

        सामाजिक बांधिलकी जपत, गरजूंसाठी आश्रयाचे मजबूत आधार ठरवणारे हे केंद्र ही आपल्या नगर परिषदेच्या सकारात्मक कामगिरीची साक्ष आहे.

Post a Comment

0 Comments