Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत मौजे मोख (ता. अक्राणी) येथे मार्गदर्शन कार्यक्रम

  राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत मौजे मोख (ता. अक्राणी) येथे मार्गदर्शन कार्यक्रम 

राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत मौजे मोख, तालुका अक्राणी येथे शेतकऱ्यांसाठी ओरिएंटेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे महत्व, फायदे आणि तांत्रिक बाबींवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

प्रशिक्षण कार्यक्रमात कृषी पर्यवेक्षक  जे. बी. पराडके,  कृषी सहाय्यक जगदीश पाडवी, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक एम. आर. बाविस्कर आदींनी मार्गदर्शन केले.

              कार्यक्रमात शेतकऱ्यांना जैविक निविष्ठा, मृदा आरोग्य, झिरो बजेट शेती तंत्र, खत निर्मिती प्रक्रिया यासारख्या महत्त्वपूर्ण बाबींबाबत माहिती देण्यात आली.

नैसर्गिक शेतीद्वारे शाश्वत शेतीचा मार्ग आणि जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी अशा उपक्रमांचे जिल्ह्यातील प्रत्येक गावात स्वागत करण्यात येत आहे !

.

.

.

#नैसर्गिकशेती #NandurbarAgri #AkraaniTaluka #कृषीउपक्रम #SustainableFarming #OrganicFarming #FarmersFirst #NandurbarAgriculture #NaturalFarming #मातीकडेचलो #शेतीसशक्तपणा

Post a Comment

0 Comments