नंदुरबार जिल्हा वकील संघ निवडणूक संपन्न
निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक अधिकारी म्हणून के. एफ. दाऊलवाला यांनी जबाबदारी पार पाडली. निवडणूक कामकाजासाठी अॅड. तरंग देसाई आणि अॅड. गणेश बैरागी यांनी मोलाचे सहकार्य केले.
अध्यक्षपदासाठी तिन्ही उमेदवारांत चुरशीची लढत
अध्यक्षपदासाठी अॅड. कमलाकर सावळे, अॅड. मनोज मोर आणि अॅड. प्रेमानंद एन. इंद्रजीत यांच्यात चुरशीची लढत रंगली. मतदान प्रक्रियेनंतर अॅड. प्रेमानंद इंद्रजीत यांनी पुन्हा एकदा अध्यक्षपदाचा मान मिळवत विजयश्री मिळवली.
उपाध्यक्ष व सहसचिवपदासाठी बिनविरोध निवड उपाध्यक्षपदी अॅड. सावंत वळवी यांची बिनविरोध निवड झाली. तसेच सहसचिवपदी मोहन गिरासे यांनी बिनविरोध निवड करण्यात आली.
सचिवपदासाठी दोन उमेदवारांत थरारक लढत सचिवपदासाठी अॅड. सारंग गिरनार आणि अॅड. संजय पाटील यांच्यात थरारक लढत झाली. अंतिम निकालात अॅड. सारंग गिरनार यांनी विजय मिळवला.
संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांततेत, नियमबद्ध आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली. नूतन कार्यकारिणीने आपल्या कार्यकाळात वकील बांधवांच्या हितासाठी नवनवीन उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
निवडणूक निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांचे वकील संघाच्या सदस्यांकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन करण्यात आले.
Post a Comment
0 Comments