Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

जिल्हा क्रीडा मैदान, नंदुरबार येथे उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांची पाहणी

जिल्हा क्रीडा मैदान, नंदुरबार येथे उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांची पाहणी 

        नंदुरबार :- जिल्हा क्रीडा मैदान, येथे उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा (भा.प्र.से), नंदुरबार यांनी भेट देऊन मैदानाची सद्यस्थिती तपासली व विकास कामांचा आढावा घेतला.

                         जिल्हा क्रीडा मैदानातील सुविधा, जलनिकासी, स्वच्छता व्यवस्था व खेळाडूंना उपलब्ध साधनांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. गवत व्यवस्थापन, प्रकाश व्यवस्था, तसेच बाथरूम व शौचालयांची स्वच्छता यामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले. क्रीडा विभाग आणि कंत्राटदारांना कामे वेळेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. उपस्थित खेळाडूंशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

             याप्रसंगी उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांनी "क्रीडा ही युवकांच्या सर्वांगीण विकासाचा मुख्य मार्ग आहे. त्यामुळे त्यांना उत्तम सुविधा देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे." असे सांगितले. व सूचना दिल्यात.


                    सोबत जिल्हा क्रीडा अधिकारी, पालिका प्रतिनिधी, अभियंते व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. खेळाडूंसाठी समर्पित, सुरक्षित आणि स्वच्छ क्रीडानिकेतन निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे.

Post a Comment

0 Comments