नंदुरबार तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी दिपक भागवत मराठे तर उपसभापतीपदी विजय लिमजी पाटील यांची बिनविरोध निवड
नंदुरबार तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी दिपक भागवत मराठे तर उपसभापतीपदी विजय लिमजी पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड प्रक्रियेनंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत घोषणाबाजी केली.
नंदुरबर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ २०२८ पर्यंत कार्यरत असुन, सर्वांना संधी मिळावी यासाठी शिवसेना संपर्कप्रमुख आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या न्याय भूमिकेतून दरवर्षी सभापती व उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया घेण्यात येत असते.
गतकालावधीत सभापती संध्या पाटील, उपसभापती गोपीचंद पवार यांनी पदाच्या राजीनामा दिला होता. त्यानंतर सहकार विभागाकडून निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली.
शनिवारी बाजार समितीच्या सभागृहात घेण्यात आलेल्या निवडणूक प्रक्रियेत दीपक मराठे यांनी सभापती तर उपसभापती पदासाठी विजय पाटील यांचे एकमेव नामांकन पत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर सहकारी संस्थेचे सहाय्यक उपनिबंधक नीरज चौधरी यांनी उभयतांची बिनविरोध निवड झाल्याची जाहीर केले.
निवडीनंतर शिवसेना संपर्कप्रमुख आ. चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांनी नवनियुक्त सभापती दीपक मराठे व उपसभापती विजय पाटील यांच्या सत्कार केला.
निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून निरज चौधरी होते. त्यांना बाजार समिती सचिव योगेश अमृतकर यांनी सहाय्य केले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी,शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी.के. पाटील, माजी जि.प अध्यक्ष वकिल पाटील,जि.प माजी बांधकाम सभापती विक्रमसिंह वळवी,माजी सभापती कैलास पाटील,जि.प माजी सदस्य देवमन पवार,मजूर फेडरेशन अध्यक्ष अंकुश पाटील, धर्मेंद्र परदेसी,बाजार समिती संचालक संध्या पाटील,सुनील पाटील,नवीन बिर्ला,ठाणसिंग राजपूत,किशोर पाटील,अनिल गिरासे,मधुकर पाटील, लकडू चौरे,दिनेश पाटील,संजय पाटील,गिरीश जैन,प्रकाश माळी,अशोक आरडे उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments