विविध दाखल्यांसाठी 'फर्स्ट इन फर्स्ट आऊट' प्रणालीची अंमलबजावणी करा-बिरसा आर्मी
तळोदा: जिल्ह्यात विविध शासकीय दाखल्यांसाठी व इतर सर्व कामकाजासाठी 'फर्स्ट इन फर्स्ट आऊट' म्हणजेच 'फिफो' प्रणालीचा काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची मागणी बिरसा आर्मीने जिल्हाधिकारी,तहसीलदार अक्कलकुवा व तळोदा यांना निवेदनाद्वारे केली आहे.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,शासनाच्या विविध प्रमाणपत्रासाठी दलालांमार्फत शॉर्टकट शोधला जातो.मग ते जात प्रमाणपत्र असो अथवा उत्पन्नाचा दाखला.दलाल प्रवृत्तीमुळे रांगेत असणाऱ्यांची कामे होत नाहीत.मात्र,जे पैसे देऊन दलालामार्फत पोहचतात,त्यांची कामे आधी होतात असाच अनुभव आहे.पण,या शॉर्टकट साधणाऱ्या दलाल प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी संपूर्ण राज्यात 'फर्स्ट इन फर्स्ट आउट' म्हणजेच फिफो प्रणाली वापरण्याचा निर्णय महाआयटीकडून घेण्यात आला आहे.तसेच या निर्णयाची अंमलबजावणी देखील सुरू करण्यात आली आहे.या प्रणालीच्या माध्यमातून प्रथम अर्ज करण्यात आलेल्या व्यक्तीचे काम आधी करण्यात येणार आहे.आधी अर्ज करणाऱ्यांना पहिले प्राधान्य
आपले सरकार या संकेतस्थळावर अथवा ऑनलाइन सरकारी केंद्रावरून प्रमाणपत्रासाठी अर्ज केला जातो.विविध डेस्कच्या माध्यमातून हे अर्ज निकाली काढण्यात येतात.याआधी अर्ज केल्यावर प्रमाणपत्र मिळण्यासाठी विलंब होत होता.आधी अर्ज केला असताना देखील मधल्याच माणसाला प्राधान्य मिळायचे.रहिवासी प्रमाणपत्र,जातीचे प्रमाणपत्र,उत्पन्न प्रमाणपत्र,नॉन क्रिमिलेअर,अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र,जेष्ठ नागरिक, अल्पभूधारक अशा विविध प्रमाणपत्रासाठी कालावधी ठरवून देण्यात आला आहे.व आकारण्यात येणारे शुल्क देखील ठरवून देण्यात आले आहे.संपूर्ण राज्यात ही प्रणाली लागू करण्यात आली आहे.वर्ध्यासह इतर जिल्ह्यात देखील या फिफो प्रणालीच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे.यासाठी विविध दाखल्यांसह इतर शासकीय कामकाज,प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्ह्यातही या प्रणालीची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी बिरसा आर्मीने केली आहे.निवेदनावर बिरसा आर्मीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाडवी,अक्कलकुवा कार्याध्यक्ष दिपक वळवी,उपाध्यक्ष पंकज पाडवी,धडगाव तालुकाध्यक्ष अजय वळवी,महेश ठाकरे,बादल ठाकरे,आमशा ठाकरे,साकऱ्या वळवी आदी, कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
Post a Comment
0 Comments