सहकार भारती सदस्य अभियान राबवावे- राष्ट्रीय महामंत्री दिलीप पाटील
नंदुरबार (प्रतिनिधी) अनेक वर्षाच्या प्रतीक्षे नंतर केंद्र शासनाने स्वतंत्र सहकार मंत्रालयाची स्थापना केली आहे.
सहकार भारतीच्या माध्यमातून सहकार क्षेत्राला मोठा वाव असून नंदुरबार जिल्ह्यात सहकार भारतीचे सदस्य अभियान व्यापक प्रमाणात राबवावे असे आवाहन सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री दिलीप पाटील यांनी केले.
नंदुरबार शहरात रविवारी सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री दिलीप पाटील यांचे आगमन झाले.
याप्रसंगी राष्ट्रीय महामंत्री दिलीप पाटील यांचे स्वागत सहकार भारतीच्या महिला आघाडी प्रमुख सुरेखा वळवी, जिल्हा संघटनमंत्री महादू हिरणवाळे यांनी केले.
पंडित दीनदयाल उपाध्याय नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री दिलीप पाटील यांनी नंदुरबार येथील सहकार भारतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. आगामी काळात व्यापक स्वरूपात बैठका घेऊन सहकार भारतीचे सदस्य अभियान वाढविण्याचे आवाहन राष्ट्रीय महामंत्री दिलीप पाटील यांनी केले.
या भेटीप्रसंगी नंदुरबार जिल्हा संघटनमंत्री महादू हिरणवाळे, महिला आघाडी प्रमुख सुरेखा वळवी,महिला सहप्रमुख श्रद्धा पाटील, किरण गायकवाड, प्रल्हाद भावसार,, प्रा. हिम्मतराव चव्हाण, पतसंस्थेचे चेअरमन नानाभाऊ माळी, व्हाईस चेअरमन मोहन चौधरी, सचिव पांडुरंग माळी, तसेच कर्मचारी उपस्थित होते.
फोटो कॅप्शन- नंदुरबार येथे सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री दिलीप पाटील यांचे स्वागत करताना महिला आघाडी प्रमुख सुरेखा वळवी सोबत नंदुरबार जिल्हा संघटनमंत्री महादू हिरणवाळे, श्रद्धा पाटील, किरण गायकवाड, प्रा. हिंमत चव्हाण, नानाभाऊ माळी, मोहन चौधरी, पांडुरंग माळी आदी.
Post a Comment
0 Comments