चांदसैली येथील 3 महिन्याच्या बालकाला मिळाले जीवनदान! आमदार राजेश पाडवी यांच्या प्रयत्नातून शस्त्रक्रिया.
‘आरोग्यम धनसंपदा’ हे ब्रीद लक्षात घेत शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश दादा पाडवी यांनी वेळोवेळी गंभीर आजारी रुग्णांना योग्य ती पुरेपूर मदत करून; नेहमीच आरोग्यदूताची भूमिका निभावताना आपण सर्वांनी पाहिले आहे.
शहादा तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या चांदसैली येथील रहिवासी सुनील सुखदेव पावरा यांचा मुलगा सावन पावरा (वय – 3 महिने) या बालकाला जन्मजात हृदयाचा आजार (Congenital Heart Disease – CHD) असल्याचे निदान झाले होते. बाळाच्या पालकांची परिस्थिती बेताची असल्याने यावरील उपचारांसाठी लागणारा खर्च त्यांना झेपवणार नव्हता. तसंच गंभीर आजारावर योग्य वेळी उपचार न झाल्यास बालकाचे प्राण संकटात येऊ शकले असते. परंतू मतदार संघातील ही बाब आमदार राजेशदादा पाडवी यांच्या लक्षात येताच त्यांनी पुढाकार घेत या बाळाचा जीव वाचवण्यासाठी आपली सूत्र हलवली तसंच पालकांना आर्थिक खर्चासंदर्भात धीरही दिला.
बाळाला असलेल्या दुर्धर हृदय विकाराची शस्त्रक्रिया अखेर पार पडली या बाळाला जन्मजात असलेल्या CHD या दुर्धर हृदय विकारावर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. मुंबईतील सर्वदूर प्रचलित असलेल्या कोकिळाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल येथे ही शस्त्रक्रिया पार पडली. या तीन महिन्याच्या बाळाला नवसंजीवन मिळाले. या शस्त्रक्रियेसाठी आमदार राजेश पाडवी यांनी स्वतः यात लक्ष घालून तज्ञ डॉक्टर आणि आरोग्य खात्यातील वरिष्ठ मंडळींशी संपर्क साधून त्यांच्या सल्ल्याने हवे ते सर्व प्रयत्न केले आणि बाळाच्या कुटुंबाला उपचारादरम्यान कोणतीही कमी भासणार नाही याची संपूर्ण काळजी घेतली. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम या आरोग्य खात्याच्या धोरणाच्या माध्यमातून बाळावर उपचार करण्यात येत आहेत
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व आरोग्य विभागाची तत्परता
यासर्व उपचारादरम्यान नंदुरबार तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नरेश पाडवी, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम जिल्हा पर्यवेक्षक श्री. मनोहर ढीवरे डॉ.राकेश पाटील (RBSk) वैद्यकीय अधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले. व बाळाला तात्काळ संदर्भ सेवा मिळाली.
शहादा या तळोदा मतदारसंघाला लाभलेले आमदार राजेश दादा पाडवी यांच्यामुळे दुर्गम भागातील अनेक कुटुंबांना अशा लहान मोठ्या सहकार्यातून आधार मिळत आहे. तसंच मतदार संघात उद्भवलेल्या प्रत्येक समस्येतून मार्ग काढण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या कार्यसम्राट आमदार राजेश पाडवी हे आरोग्यदूत बनून या 3 महिन्याच्या बाळाचे प्राण वाचवले आहे.
Post a Comment
0 Comments