तालुका विधी सेवा समितीची अक्कलकुवा येथे बैठक संपन्न — न्याय व हक्क तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार
दिनांक १३ जून २०२५ रोजी अक्कलकुवा तालुका विधी सेवा समितीची बैठक आयोजित करण्यात आली. दुर्गम व आदिवासी भागांतील नागरिकांपर्यंत विधी सेवा व न्याय सुविधा प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.
या बैठकीत अक्कलकुवा तालुक्यातील डोंगराळ आणि दुर्गम भागांतील आदिवासी जनतेपर्यंत मोफत विधी सेवा पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करणे. विधी साक्षरता शिबिरे, जनजागृती कार्यक्रम आणि मदत केंद्र सुरू करण्याबाबत चर्चा. प्रशासन, बँका आणि परिवहन विभाग यांचा समन्वय साधून सेवा पोहच कार्य अधिक प्रभावी करणे.
याप्रसंगी न्यायाधीश श्री. शितोळे, अक्कलकुवा तहसीलदार विनायक घुमरे, एसबीआय बँक मॅनेजर मेश्राम, एसटी डेपो अक्कलकुवा आगार व्यवस्थापक, विधी प्राधिकरणाचे सदस्य आणि मान्यवर वकिल आदी उपस्थित होते.
“न्याय सर्वांसाठी, न्याय तळागाळात” या तत्त्वावर आधारित हा उपक्रम अक्कलकुवा तालुक्यातील नागरिकांच्या हक्कांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
.
.
.
#LegalAwareness #TalukaLegalServicesCommittee
#AccessToJustice #Akkalkuwa #TribalRights
#DistrictAdministration #LegalAid #NandurbarJustice #RuleOfLaw
Post a Comment
0 Comments