मोड येथे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते आदिवासी सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन
तळोदा तालुक्यातील मोड गावात आदिवासी समाजासाठी उभारण्यात येणाऱ्या सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून एक कोटी रुपये या भवनासाठी मंजूर करण्यात आले असून, या भवनामुळे गावातील विविध सामाजिक, सांस्कृतिक व कौटुंबिक कार्यक्रमांसाठी एक हक्काचे व सुसज्ज ठिकाण उपलब्ध होणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप चौधरी, भाजपा किसान मोर्चाचे श्याम राजपूत, जिल्हा महामंत्री बळीराम पाडवी, नारायण ठाकरे, तालुकाध्यक्ष दरबारसिंग पाडवी, प्रवीणसिंह राजपूत, प्रकाश वळवी, दारासिंग पाडवी, पुरुषोत्तम चव्हाण, सरपंच सविता भंडारी गुलाबसिंग गीरासे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
. भूमिपूजन प्रसंगी औपचारिक फलकाचे अनावरण करण्यात आले आणि नारळ फोडून विधिवत भूमिपूजन पार पडले. या वेळी आमदार राजेश पाडवी यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधताना सांगितले की, "राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना गोरगरिबांपर्यंत पोहोचविण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. गावात कोणत्याही प्रकारच्या विकास कामासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. भविष्यातही ग्रामविकासासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल."या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत सदस्य रंजीत वळवी, गौरव चौधरी, भूषण चव्हाण, राणाजी भिलावे, सबीसिंग पाडवी, लक्ष्मण ठाकरे, शिवनाथ नाईक, संतोष ठाकरे, प्रकाश ठाकरे, दिपक माळी, संदिप भिल, छोट्या ठाकरे यांचे मोलाचे योगदान लाभले.

Post a Comment
0 Comments