शहादा उपविभागीय अधिकारी कृष्णकांत कनवरिया यांचा ग्रामविकास दौरा
शहादा उपविभागीय अधिकारी कृष्णकांत कनवरिया यांनी आज विविध ठिकाणी भेटी देत गाव पातळीवरील शासकीय योजना आणि कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.
शहादा उपविभागीय अधिकारी कृष्णकांत कनवरिया यांचा ग्रामविकास दौरा केला. त्यात अलखेड येथे शेतजमिनीची पाहणी करत शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
लोणखेडा येथे प्रधानमंत्री धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान कार्यक्रमात उपस्थित राहून लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्ड वितरित केली. डोंगरगाव चौफुली येथे जलवाहिनी प्रकल्पाच्या चारीची पाहणी करत प्रत्यक्ष स्थितीची माहिती घेतली.
जल जीवन मिशन संदर्भात सरपंच व ग्रामस्थांशी विशेष बैठक घेऊन अंमलबजावणी, अडचणी व पुढील टप्प्यांवर चर्चा केली.
उपविभागीय अधिकाऱ्यांनी गावात सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेत ग्रामविकास व योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले.
Post a Comment
0 Comments