Type Here to Get Search Results !

तळोदा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

 तळोदा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

            तळोदा – दरवर्षी २१ जून रोजी संपूर्ण जगभरात योगाच्या महत्त्वाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. त्या अनुषंगाने माळी समाज मंगल कार्यालय तळोदा येथे ही आज सकाळी सहा वाजता योग दिनाचा भव्य कार्यक्रम संपन्न झाला.

                 या कार्यक्रमास शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. त्यांनी योगाचे महत्त्व सांगून उपस्थित नागरिकांना नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले. योग शिक्षिका सविता कलाल, शिक्षक स्वप्नील राणे, उदय सूर्यवंशी यांनी योगाचे प्रत्यक्षिक करून मार्गदर्शन केले.

              कार्यक्रमात महामंत्री बळीराम पाडवी, तळोदा माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, शहराध्यक्ष गौरव वाणी, तालुकाध्यक्ष दरबार पाडवी, तसेच जगदीश परदेशी, विवेक पाडवी, शिरीष माळी, प्रदीप शेंडे, दीपक कलाल, कृष्णा महाराज, गोकुळ मिस्त्री, अनिल परदेशी, योगेश पाडवी, योगेश गुरव, विलास लोखंडे, गुलाब जोहरी यांचा सक्रिय सहभाग होता.

सर्व मान्यवर व नागरिकांनी सामूहिकरित्या योगाभ्यास केला. या प्रसंगी उपस्थितांनी सकारात्मक ऊर्जा व निरोगी जीवनशैलीसाठी योगाचे महत्त्व अनुभवले.

Post a Comment

0 Comments