Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

जि.प. शाळा बाल आमराई येथे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची प्रेरणादायी शाळा भेट !

 जि.प. शाळा बाल आमराई येथे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची प्रेरणादायी शाळा भेट !

 नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी (IAS),  शिवांश (IAS) व प्राचार्य  प्रवीण महाजन (DIET) यांनी जि.प. शाळा बाल आमराई येथे औपचारिकतेशिवाय आपुलकीने शाळा भेट दिली. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला.


शाळेतील विद्यार्थ्यांशी पाढे पाठांतर, वाचन, खेळ, भविष्याचे स्वप्न आणि गावात हवी असलेली प्रगती या विषयांवर गोड गप्पा केल्या. मॅडम यांनी प्रत्येक विद्याला "तुम्हाला गावात काय काय हवे आहे?" हे पत्राद्वारे सांगण्याचे आवाहन केले. ज्यातून त्यांच्या मनातील भावना व गरजा समजून घेण्याचा एक सुंदर उपक्रम राबविण्यात आला.


एक पेड माँ के नाम डॉ. मित्ताली सेठी (IAS) यांनी आपल्या मातोश्री अंजली सेठी यांच्या सन्मानार्थ शाळेच्या परिसरात कडुनिंबाचे रोपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.


शैक्षणिक गुणवत्ता व कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करीत जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेच्या एकंदरीत शैक्षणिक कामकाजाचे कौतुक करत समाधान व्यक्त केले आणि त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील प्रयत्नांना प्रोत्साहन दिले.

Post a Comment

0 Comments