Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात ग्रामपातळीवरील संवाद व आढावा बैठक

 नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासंदर्भा तळोदा तालुक्यात ग्रामपातळीवरील संवाद व आढावा बैठक

                    तळोदा :- तालुक्यात नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी बिजरीबारी व वाल्हेरी गावांना भेट देत ग्रामस्थांशी थेट संवाद साधला व त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. या भेटीदरम्यान गावातील समस्या व संभाव्य नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांवर चर्चा झाली.

                 तळोदा तालुक्यात ग्रामपातळीवरील संवाद व आढावा बैठकीस तळोदा तहसीलदार दिपक धिवरे, गट विकास अधिकारी राजू किरवे,  वन परीक्षेत्र अधिकारी संतनू सोनवणे, बाल विकास प्रकल्प अधिकारी सागर वाघ व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


                  तदनंतर तहसील कार्यालय, तळोदा येथे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने तालुक्यातील सर्व विभाग प्रमुखांसोबत आढावा बैठक घेण्यात आली.

                या बैठकीत पावसाळ्यातील पूर परिस्थिती, आपत्तीवेळी संपर्क, मदत, बचाव आणि पूर्वतयारी याविषयी सखोल चर्चा करण्यात आली.

                         जिल्हा प्रशासनाकडून आपत्तीपूर्व नियोजनासाठी ग्रामपातळीवर जनसहभाग आणि अधिकारी समन्वय अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे.

            सतर्क प्रशासन, सुरक्षित जनता हा उद्देश जिल्हा प्रशासनाच्या प्रत्येक कृतीतून स्पष्टपणे दिसून येतो.

.

.

.


#Nandurbar #DisasterPreparedness #TahsildarOffice #Taloda #GramSamvad #CollectorVisit #FloodPreparedness #DisasterManagement #MonsoonReadiness

Post a Comment

0 Comments