शहादा सार्वजनिक बांधकाम विभागाची तत्परता – तिखोरा रस्त्यावरील पुलाजवळील खड्ड्यांची दुरुस्ती पूर्ण
शहादा तालुक्यातील सुलवाडे-पिप्री-आवघे-मोहिदा-उंटावद-तिखोरा रस्ता (प्र. क्र. 39) हा रस्ता सध्या अंकलेश्वर-बऱ्हाणपूर मार्गावरील पर्यायी अवजड वाहन वाहतुकीसाठी वापरला जात आहे.
डामरखेडा व तिखोरा पुल बंद असल्यामुळे वाहनांची वर्दळ या मार्गावर वळवण्यात आली आहे. त्यामुळे तिखोरा गावालगत किमी 15/00 वर 14 मीटर लांबीच्या पुलाजवळील भराव खचत होता व मोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांना अडचण निर्माण होत होती.
यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग, शहादा यांच्याकडून रस्त्यावर झालेली खड्डे मुरुमाने भरून दुरुस्त करण्यात आले. पुलालगत सेफ्टी प्रिकॉशन (सुरक्षितता उपकरणे) बसविण्यात आली. उंटावद ते तिखोरा दरम्यान अप्रोच रस्त्यावरील दुरुस्ती काम पूर्ण करण्यात आली.
ही तातडीची कारवाई केल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला असून नागरिकांची वाहतुकीतील गैरसोय दूर झाली आहे.
.
.
.
#Nandurbar #PWDShahada #RoadRepair #PublicSafety #TikhoraBridge #InfrastructureUpdate #सार्वजनिकबांधकामविभाग #शहादा #रस्तादुरुस्ती #ग्रामीणविकास
Post a Comment
0 Comments