Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

वि. हि. प. बजरंग दल प्रखंड तळोदा बजरंग दल संयोजक पदी वरुण राजपूत यांची नियुक्ती

 वि. हि. प. बजरंग दल प्रखंड तळोदा बजरंग दल संयोजक पदी वरुण राजपूत यांची नियुक्ती

                  तळोदा:-  विश्व हिंदू परिषद बजरंग दल प्रखंड तळोदा यांची वार्षिक बैठक  संपन्न. वी. ही. प. जिल्हा अध्यक्ष जतनदादा पाडवी, जिल्हा मंत्री शामरावजी गावीत, सह मंत्री गोपालजी बुनकर यांच्या उपस्थितीत दिनांक १७ रोजी वी. ही. प. व बजरंग दल प्रखंड तळोदा येथे बैठक  संपन्न झाली.

                या बैठकीत नवीन पदाधिकार्यांना गोपालजी बुनकर यांनी मार्गदर्शन केले. देव, देश, धर्मासाठी कार्य कसे करावे आणि  कार्यकर्त्यांनी  समाजात आपला संपर्क कसा वाढवावा, धर्म कार्य कसे करावे याचे मार्गदर्शन केले. जिल्हा मंत्री यांनी मठ मंदिर प्रमुखाने कसे काम करावे. अर्चक, महाराज, पुजारी यांच्याशी संपर्क कसा ठेवावा, मठ मंदिरा ची स्वच्छता नियोजन कसे करावे आणि पदाधिकारी यांनी आपली जबाबदारीने कार्य करुन कार्यक्रम कसे पार पाडावेत.लोक हित, समाजाच्या अडचणी कश्या सोडवाव्यात.धर्म रक्षानिधी संकलन, समरसता, ग्राम समिती काय असते, तिचे कार्य आणि उद्दिष्टे याची माहिती दिली. नवीन वि. हि. प. नियुक्ती बाबत चर्चा करून पदांची फेर रचना केली.

Post a Comment

0 Comments