शिवसेनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त शहादा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप
शहादा तालुका शिवसेना तर्फे शिवसेनेच्या ५९व्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत शहादा येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना व सोबत असलेल्या नातेवाईकांना फळ वाटप करण्यात आले.
कार्यक्रम शिवसेनेचे नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमश्या दादा पाडवी व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राम भैय्या रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा शिवसेना तर्फे शहादा येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना सामाजिक बांधिलकी जपत प्रत्येक रुग्णांना व सोबत असलेल्या नातेवाईकांना फळ वाटप करण्यात आले.
या प्रसंगी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची आस्थेवाईकपणे विचारपुस करीत रुग्णांच्या समस्या जाणुन घेतल्या या प्रसंगी माजी नगरसेवक व ज्येष्ठ शिवसेना नेते सुपडू खेडकर, शिवसेनेचे जिल्हा उप प्रमुख डॉ.राजेंद्र पेंढारकर, राजेंद्र गायकवाड, लोटन धोबी, संतोष वाल्हे, मनलेश जायसवाल, राजरत्न बिरारे, विजय गायकवाड, प्रवीण सैदाने, प्रवीण बोरदेकर, मनोज पाथरवड तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ. बर्डे, डॉ. राकेश पाटील व कर्मचारी वर्ग सह आदी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments