Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेत जागतिक योगा दिवस

 

बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेत जागतिक योगा दिवस साजरा

     नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेत जागतिक योगा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

            कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक डी एस पाटील यांनी विद्यार्थ्यांना जागतिक योग दिवसाविषयी माहिती देताना आपल्या जीवनात योगा व प्राणायामाला खूप महत्त्व आहे. आपले शरीर निरोगी राहण्यासाठी सदैव योग व प्राणायाम केला पाहिजे ज्याने आपल्या जीवनात येणारा ताण तणाव दूर होत असतो व शरीराला बळकटी मिळत असते असे मार्गदर्शनपर विचार विद्यार्थ्यांना समोर मांडले. तर क्रीडा शिक्षक विजय पवार यांनी योगा दिवसाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. 

              यावेळी शाळेचे  कलाशिक्षक आनंदराव पवार यांनी  विविध योग व प्राणायामाचे विविध प्रात्यक्षिके  करून दाखवले ज्यामध्ये अनुलोम विलोम, कपालभाती, सह  18 प्रात्यक्षिके  करून दाखवली.  यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दत्तू पाटील, उपशिक्षक दीपक वळवी, रामानंद बागले, हरून खा शिखलीकर, संजय बोरसे ,संदीप गायकवाड, श्रीमती संगीता गोखले, लिपिक नेहा शर्मा यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनींनी योग व प्राणायाम प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी झाले होते.

      सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिपाई संजय वसावे, दिनेश पवार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी हास्यासन घेण्यात आले.

Post a Comment

0 Comments