Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

तळोदा एस.ए.एम.इंग्लिश मीडियम स्कूल येथे प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

 तळोदा एस.ए.एम.इंग्लिश मीडियम स्कूल येथे प्रवेशोत्सव उत्साहात साजरा 

                     तळोदा येथील एस. ए. एम. इंग्लिश मीडियम स्कूल येथे आज सोमवार दिनांक 16 जून 2025 रोजी शाळा प्रवेश जल्लोषात साजरा करण्यात आला. 

           यावेळी के.जी सेक्शन च्या शाळेचा पहिला दिवस असल्याने चिमुकल्यांच्या स्वागतासाठी मुख्याध्यापक सत्यजित नाईक व सर्व शिक्षक वेळेवर हजर होते. रांगोळी काढून, ढोल ताशाच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

               मिकी माऊस व डोनाल्ड डक वेशभूषा करून तसेच विविध प्राण्यांचे वेशभूषा करून विद्यार्थ्यांचे मनोरंजन करण्यात आले.याप्रसंगी विद्यार्थ्यांना चॉकलेट देऊन मुख्याध्यापक श्री नाईक सरांनी शाळेत चिमुकल्यांच्या  स्वागत केले. 

             विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा प्रयत्नशील असून विविध उपक्रम व  शालेय व सहशालेय कार्यक्रमाद्वारे मुलांची जडणघडण शाळेत होते तसेच शाळा ही विद्यार्थ्यांचे दुसरे घर असते  शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पालक म्हणून भूमिका बजवावी असे प्रतिपादन केले.

Post a Comment

0 Comments