Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

नवागाव जि.प. शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात

 नवागाव जि.प. शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात

                   तळोदा तालुक्यातील नवागाव येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत शाळा प्रवेशोत्सव अंतर्गत नवागतांचे स्वागत जल्लोषात करण्यात आले.

                         याप्रसंगी शिक्षणविस्तार अधिकारी वसंत जाधव यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात प्रभातफेरी ने करण्यात आली. नवीन दाखल होणाऱ्या बालकांना सजवलेल्या चार चाकी गाडीमधून शाळेत आणण्यात आले.  त्यानंतर नवागत बालकांचे शाळेच्या प्रवेशद्वारावर औक्षण करून त्यांच्या शाळेतील पहिल्या पावलांचे कागदावर ठसे घेण्यात आले. मुलांना पुष्प व चॉकलेट देऊन टाळ्यांच्या गजरात त्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. 


यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जाधव हे होते. विद्येची देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश व चॉकलेट वाटप करण्यात आले. त्याच बरोबर इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनी दिव्या आकाश पाडवी हिचा वाढदिवस लेखन साहित्य व पुष्पगुच्छ देऊन साजरा करण्यात आला.

मुलांना जेवणात व्हेजिटेबल पुलाव व जिलेबी देण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र वसईकर यांनी केले. जाधव साहेबांनी विद्यार्थी शिक्षक यांना मार्गदर्शन करत नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रवीण ठाकरे, पालक शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय सराफ यांनी केले तर आभार विजयालक्ष्मी पाडवी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अर्जुन सोनवणे, सुनील पावरा, वनश्री पावरा यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments