Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

नेमसुशिल विद्यामंदिरात ज्ञानरूपी छत्रीच्या माध्यमातून शालेय गुणवैशिष्ट्यांचे सादरीकरण

 नेमसुशिल विद्यामंदिरात ज्ञानरूपी छत्रीच्या माध्यमातून शालेय गुणवैशिष्ट्यांचे सादरीकरण


दिनांक 16 जून - शालेय प्रवेशोत्सवाचे औचित्य साधून तळोदा येथील नेमसुशिल माध्यमिक विद्यामंदिरात विविध कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.

                    या कार्यक्रमात ज्ञानरूपी छत्रीद्वारे रॅलीच्या माध्यमातून  शालेय वैशिष्ट्यांचे सादरीकरण करण्यात आले. प्रसंगी प्राचार्य सुनिल परदेशी  मुख्याध्यापिका  भावना डोंगरे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात शारदादेवी पूजनाने झाली.  यावेळी रॅली काढून शालेय मुख्यद्वारा जवळ विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे वाटप व विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 


सदर कार्यक्रमाचे संस्थाध्यक्ष निखिल भाई तुरखिया,उपाध्यक्ष महाले आप्पा, सचिव संजय भाई पटेल, संचालिका सोनाभाभी तुरखिया व संस्था समन्वयक हर्षिल तुरखिया यांनी कौतुकास्पद अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments