मशरूम शेतीद्वारे महिलांचा आर्थिक सशक्तीकरणाचा नवा मार्ग नव-तेजस्विनी कार्यक्रमांतर्गत मार्गदर्शन सत्र यशस्वी!
नंदुरबार : महिला आर्थिक विकास महामंडळ, नंदुरबार आणि चेतना लोकसंचलित साधन केंद्र, वाण्याविहीर यांच्या संयुक्त विद्यमाने पुनर्वसन येथील महिला बचत गटातील महिलांसाठी मशरूम शेतीविषयी मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रात राजेंद्र वसावे यांनी महिलांना मशरूम शेतीचे संपूर्ण मार्गदर्शन केले.
सत्राची मशरूम शेतीची संकल्पना महिलांना मशरूम शेती म्हणजे काय, ती कशी केली जाते, याचे सविस्तर ज्ञान देण्यात आले.
कमी जागेत, कमी खर्चात आणि अल्प कालावधीत उत्पादन देणारी ही शेती पद्धत महिलांसाठी उत्पन्नाचा उत्तम पर्याय ठरू शकते, हे अधोरेखित करण्यात आले. वाढती बाजारपेठ आणि निर्यात क्षमतेमुळे ही शेती महिलांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते.
लागणारे साहित्य, बियाणे, कचऱ्याचे पुनर्वापराचे मार्ग शेड कशी बनवावी, योग्य तापमान आणि आर्द्रतेचे व्यवस्थापन ऑइस्टर मशरूम, कुकुरमुत्ता या जातींची माहिती
प्रशिक्षणाची घोषणा:
महिलांना प्रत्यक्ष मशरूम लागवडीचे प्रशिक्षण जून अखेरीस देण्यात येणार आहे. यात लागवड, व्यवस्थापन, साठवणूक, विक्री यासंबंधी सर्व माहिती दिली जाईल. इच्छुक महिलांनी नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले.
सदर युनिट उभारणी करिता महिलांना तेजश्री योजनेतून वैयक्तिक सहाय्य करण्यात येईल.
महिला सशक्तीकरणाचा टप्पा:
या उपक्रमातून महिला बचत गटातील सदस्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळणार असून, स्वावलंबी महिला उद्योजक निर्माण करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
कार्यक्रमास चेतना लोकसंचलित साधन केंद्राचे व्यवस्थापक, सहयोगिनी, उपजीविका सल्लागार यांचीही उपस्थिती लाभली.
ही अभिनव व उद्योजकता-वर्धक संधी नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांसाठी एक नवा आर्थिक प्रवाह उभा करेल, याची खात्री जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे.
.
.
.
#NavTejaswini #MAVIMNandurbar #WomenEmpowerment
#MushroomFarming #MahilaBachatGat #RuralEntrepreneurship
#TejaswiniMahila #SkillDevelopment #FinancialIndependence
Post a Comment
0 Comments