Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

खान्देश शाहीर हरिभाऊ पाटील यांच्या जयंतीदिनी दि. 21 रोजी ‘पालकत्व निभावतांना’ या विषयावर सतीश पाटील यांचे व्याख्यान

 खान्देश शाहीर हरिभाऊ पाटील यांच्या जयंतीदिनी दि. 21 रोजी

‘पालकत्व निभावतांना’ या विषयावर सतीश पाटील यांचे व्याख्यान

                     नंदुरबार- स्वातंत्र्य सैनिक शाहीर हरिभाऊ पाटील यांच्या जयंती निमित्ताने ‘पालकत्व निभावतांना’ हा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम दिनांक 21 जून रोजी  शनिवारी दुपारी चार वाजता शाहीर हरिभाऊ पाटील मराठा मंगल कार्यालय, ज्ञानदीप सोसायटी नंदुरबार  येथे आयोजित केला आहे.  समाज प्रबोधनपर उपक्रमासाठी पुणे येथील सुप्रसिद्ध वक्ते सतीश पाटील यांचे ‘पालकत्व निभावताना’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. या मार्गदर्शनात बदलत्या काळात स्पर्धात्मक युगात आपले अपत्य घडवताना पालक म्हणून आपली भूमिका कशी असावी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रसंगी अध्यक्षस्थानी  डॉ.गुलाबराव मराठे, माजी जिल्हा शल्यचिकित्सक व  अध्यक्ष स्वातंत्र्यसैनिक शाहीर हरिभाऊ पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नंदुरबार यांची उपस्थिती लाभणार आहे. तरी सर्व पालक व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला हजर राहावे अशी विनंती   मराठा पाटील समाजसेवा मंडळ नंदुरबार अध्यक्ष प्राचार्य दादासाहेब बी.एस. पाटील, सचिव नानासाहेब यशवंतराव. दे. पाटील तसेच स्वा.सै. शाहीर हरिभाऊ पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments