विश्व योग संयोजन समितीतर्फे शनिवारी नंदुरबारच्या जीटीपी मैदानावर भव्य विश्व योग दिनाचे आयोजन
नंदुरबार (प्रतिनिधी) विश्व योग दिनाचे औचित्य साधून विश्व योग संयोजन समिती आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. 21 जून रोजी सकाळी सात वाजता जी. टी. पाटील महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य योग शिबिर होणार आहे. यंदा प्रथमच पतंजली योग समिती महाराष्ट्र राज्य पूर्वचे प्रभारी नांदेड येथील अनिल अमृतवार हे योग संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.
अकराव्या योग दिनानिमित्त एक दिवसीय योग शिबिरात योगासने, सूक्ष्म व्यायाम यांचे प्रशिक्षण देण्यात येईल. विश्व योग संयोजन समिती,जिल्हाधिकारी कार्यालय, पतंजली योग समिती, भारत स्वाभिमा न्यास, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गायत्री परिवार, जी. टी. पाटील महाविद्यालय,शिक्षण अधिकारी माध्यमिक व प्राथमिक, जिल्हा परिषद नंदुरबार यांचे सहकार्य लाभले आहे. जीटी पाटील महाविद्यालयाच्या मैदानावर योगासन शिबिर होईल. महिलांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करण्यात आली असून पाऊस आल्यास जिमखान्यातील हॉलमध्ये योगासन शिबिर होईल. शनिवारी होणाऱ्या भव्य योग शिबिरात शालेय विद्यार्थ्यांसह पालकांनी तसेच शहर व परिसरातील सर्वच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून योग शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने निमंत्रक यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments