Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

करजकुपा येथील ग्रामस्थ शेतकरी विजेअभावी हैराण, कायमस्वरूपी उपाय योजनाची संतप्त ग्रामस्थांची मागणी

 करजकुपा येथील ग्रामस्थ शेतकरी विजेअभावी हैराण, 

कायमस्वरूपी उपाय योजनाची संतप्त  ग्रामस्थांची मागणी 

             नंदुरबार (प्रतिनिधी) तालुक्यातील करजकूपा गावातील रहिवाशी ग्रामस्थ व शेतकरी रात्री होणाऱ्या खंडित वीज पुरवठा आणि  भारनियमनामुळे त्रस्त झाले असून  शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. चालू लाईनवर वीज मंडळाचे तीन ते चार तास काम सुरू असताना विद्युत पुरवठा बंद कालावधीतील वेळ देखील वीज मंडळाने भरून मिळावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. या गावात अवकाळी पावसाने विजेचे खांब  पडल्यामुळे सध्या विद्युत पुरवठा सुंदरदे येथुन होत असतो. विद्युत रोहित्र जळण्याचे प्रकार 15 ते 20 दिवसात सातत्याने होत आहेत. सदर प्रकार वारंवार होत असल्याने कायमस्वरूपी उपाय योजना करावी यासाठी महावितरण कार्यालयात करजकुपा येथील शंभरावर ग्रामस्थांनी समस्या घेऊन आले असता कार्यकारी अभियंता मिटींगला गेल्याने भेट होऊ शकली नाही. याबाबत कार्यकारी अभियंता विकास पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे शेतकऱ्यांनी कैफियत मांडली. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते अंबालाल सखाराम चौधरी यांनी दिली. पातोंडा सब स्टेशन वरून कायमस्वरूपी विद्युत तारा जोडाव्यात अशी मागणी  करजकुपा ग्रामस्थांची  असून महावितरण अधिकाऱ्यांनी या भागातील समस्येची प्रत्यक्ष पाहणी करावी असेही करजकुपा ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Post a Comment

0 Comments