Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान नंदुरबार जिल्ह्यात पहिल्या दिवशी यशस्वी गतीने शिबिरांचे आयोजन

  प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान नंदुरबार जिल्ह्यात पहिल्या दिवशी यशस्वी गतीने शिबिरांचे आयोजन

नंदुरबार |

केंद्र सरकारच्या आदिवासी कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान 2025 अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये आज पहिल्या दिवशी एकात्मिक लाभ वितरण शिबिरे यशस्वीपणे पार पडली.

                            या अभियानाचा उद्देश आदिवासी समुदायातील प्रत्येक कुटुंबापर्यंत शासनाच्या योजनांचा थेट लाभ पोहोचविणे आणि त्यांचे सामाजिक-आर्थिक सक्षमीकरण साधणे हा आहे. जिल्ह्यातील सर्व विभाग आणि ग्रामपंचायतींच्या समन्वयातून ही मोहीम व्यापक स्तरावर सुरू झाली आहे.

             शहादा तालुका – ग्रामपंचायत लोणखेडा व वस्तराव नाईक हायस्कूल शहादा उपविभागीय अधिकारी कृष्णकांत कनवारिया, तहसीलदार दीपक गिरासे, आदीच्या प्रमुख उपस्थित एकूण 376 लाभार्थी असून 360 च्या अधिक लाभार्थीना आधार नोंदणी, आयुष्यमान कार्ड, उत्पन्न, डोमिसाईल, जात, नॉन क्रिमिलिअर, जन्म, मृत्यू व विवाह नोंदणीचे दाखले वितरण केले.

                                  तळोदा तालुका – आश्रमशाळा शिर्वे व ग्रामपंचायत आमलाड येथे आमदार राजेश पाडवी, सहा. जिल्हाधिकारी अनय नावंदर, तहसीलदार दिपक धिवरे, गटविकास अधिकारी आदी मान्यवरांचा उपस्थित दाखले वितरण केले. यावेळी एकूण 265 लाभार्थी  होते. 130+ एकूण  दाखले वितरित केले.

             नवापूर तालुका – ग्रामपंचायत विसरवाडी व लक्कडकोट येथे गटविकास अधिकारी देवरे व विविध विभागांचे अधिकारी उपस्थितीत  एकूण लाभार्थी: 307 पैकी 133 लाभार्थीनाउत्पन्न प्रमाणपत्र, रहिवास, डोमिसाईल, जॉब कार्ड, जिवंत 7/12 इ. दाखले वितरित करण्यात आले.

          धडगाव तालुका – धनाजे बु. व काकरद येथे तहसीलदार व गटविकास अधिकारी आदींच्या प्रमुख उपस्थित लाभार्थी: 135 एकूण  98 दाखले वितरित करण्यात आले.


          अक्कलकुवा तालुका – सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय, सोरापाडा येथे यशस्वी आयोजन, विविध योजनांचे लाभ व दाखले वाटप केले.


           नंदुरबार तालुका – नंदुरबार पंचायत समिती व  ग्रामपंचायत वाघाळे, विभागीय सहभाग: पंचायत समिती, कृषी, आरोग्य, तलाठी, आधार, इत्यादीउपस्थित वाटप झाले.


 नंदुरबार तहसीलदार मिलिंद कुलथे, आदिवासी प्रकल्प सहा. प्रकल्प अधिकारी किरण मोरे, विस्तार अधिकारी सागर राजपूत पंचायत समिती नंदुरबार एकूण  183 लाभार्थी एकूण 86 दाखले वितरित करण्यात आले. त्यात उत्पनाचे दाखले - 41, डोमासाईल -12, जिवंत 7/12- 40,रहिवास- 02, जॉब कार्ड- 02 इ.समावेश आहे. तसेच विविध योजनांचे फॉर्म भरून घेण्यात आले.

                 जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम जिल्ह्यात १५ जून ते ३० जून २०२५ दरम्यान प्रभावीपणे राबविला जात असून पहिल्याच दिवशी नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. शेकडो लाभार्थ्यांनी विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ घेतला.

नंदुरबार जिल्हा प्रशासन जनतेला हक्काचे लाभ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे.


#धरतीआबा_अभियान #PMDAJGUA #NandurbarForTribes

#TribalEmpowerment #DigitalGovernance #LastMileDelivery

#NandurbarDistrict #AdiwasiVikas #Jansanvad #SarkarApkeDwaar

Post a Comment

0 Comments