Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कोलवीमाळ येथे याहा मोगी माता व फुल मोगरा माता मंदिर उभारणीसाठीची आढावा बैठक संपन्न

 कोलवीमाळ येथे याहा मोगी माता व फुल मोगरा माता मंदिर उभारणीसाठीची आढावा बैठक संपन्न


                  कोलवीमाळ (ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) –

शेकडो वर्षांचा इतिहास लाभलेले आणि आदिवासी श्रद्धेचं प्रतीक असलेलं याहा मोगी माता व फुल मोगरा माता मंदिर पुन्हा भव्य रूपात साकारण्यासाठी ग्रामस्थांनी अ‍ॅड. रुपसिंग वसावे यांच्या नेतृत्वाखाली पुढाकार घेतला असून, मंदिराच्या जीर्णोद्धार व नव्याने उभारणीसाठी दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी एक महत्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली.


या बैठकीत सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि युवक प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले योगदान देण्याची ग्वाही दिली. अ‍ॅड. रुपसिंग वसावे यांनी मंदिराचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व प्रभावीपणे मांडत, समाजाच्या एकजुटीमुळे हे कार्य निश्चितपणे यशस्वी होईल, असा आत्मविश्वास व्यक्त केला.


कोलवीमाळ गावात अनेक वर्षांपासून पारंपरिक यात्रा भरत असून, या मातेस संपूर्ण परिसरातून भक्तगण श्रद्धेने येतात. हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नसून, आदिवासी संस्कृतीची आणि अस्मितेची निशाणी आहे. या पार्श्वभूमीवर जीर्णोद्धारासाठी सर्व ग्रामस्थ आणि मान्यवरांनी एकत्र येऊन अभूतपूर्व ऐक्य दाखवले.


बैठकीत मंदिर उभारणीसाठी चालू असलेली कामे, निधी संकलन, लोकसहभाग, श्रमदान, यात्रा नियोजन आणि भविष्यातील दिशा यावर सविस्तर चर्चा झाली. काहींनी देणगी जाहीर केली, तर काहींनी श्रमदानाचे वचन दिले.


उपस्थित मान्यवरांमध्ये नागेश पाडवी, किरसिंग वसावे, प्रताप वसावे, जगदीश वसावे, कमलेशभाई गुरव (सागबारा), योगेश वसावा, अ‍ॅड. सुधीर पाडवी, अ‍ॅड. नरेश वळवी, महेश तंवर, अमृत चौधरी, गुमानसिंग वसावे (सरपंच), भारसिंग वसावे (पोलीस पाटील), रेमता महाराज, विज्या पुंजारा, तिज्या महाराज, राजु तडवी, छगन वसावे, मधुकर वळवी तसेच गावातील युवक, महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.


बैठकीनंतर संपूर्ण गावात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. मंदिराच्या कामास गती देण्यासाठी एक समन्वयक कार्यगट तयार करण्याचे ठरवण्यात आले.

Post a Comment

0 Comments