Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

भाजपा अनुसुचित जाति मोर्चाचा वतीने महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

 भाजपा अनुसुचित जाति मोर्चाचा वतीने महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

तळोदा :- भारतीय जनता पार्टी अनुसुचित जाति मोर्चाचा वतीने महामानव भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४वी जयंती निमित्त फुल पुष्प हार अर्पन करुन अभिवादन करण्यात आले.

 महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान अभियान दि १३ ते २५ एप्रिल पर्यंत राबविण्यात येणार आहे त्या निमित्त जेष्ट नेते प्रा.विलास जी डामरे सर यांच्या जनसंपर्क कार्यालयात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाचे आयोजन भाजप अनुसुचित जाति मोर्चा जिल्हा तर्फे करण्यात आले. याप्रसंगी जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते प्रा विलास डामरे, माजी नगराध्यक्षा सौ.हेमलता डामरे, सुभाष जी जैन, सुरेश माळी, कलीम अन्सारी, योगेश मराठे, अंबालाल साठे,जगदीश परदेशी, श्रावण तिजवीज,  संदीप साळी, अविनाश मराठे सर आणि  आदी मान्यवर उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments