Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

बिलगांव-हेंद्र्यापाडा गांवातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती पाणी टंचाई वर उपाययोजना करावी मागणी

 बिलगांव-हेंद्र्यापाडा गांवातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती पाणी टंचाई वर उपाययोजना करावी मागणी



                  धडगांव तालुक्यातील बिलगांव-हेंद्र्यापाडा गांवातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. डोंगरद-यातून पिण्यासाठी हंडाभर पाणी आणावे लागत आहे.डोंगरद-याची एवढी बिकट वाट आहे की, हंडा गाभर पाणी आणताना वाटेतच पाण्याचा हंडा अर्धा होतो; घरात अर्धा हंडाच पाणी पोहचते. हर घर नल चा दिंडोरा पेटवत सरकार देशभर जनजीवन मिशन योजना राबविण्यात आहे.या योजनेतून प्रत्येक व्यक्तीला शुद्ध पाणी प्यायला मिळाले पाहिजे,प्रत्येक घरात शुद्ध पाणी पोहचवणे हा मुख्य  उद्देश असला तरी हेंद्र्यापाडा सारख्या आदिवासी  दुर्गम भागात जलजीवन मिशन योजना नुसती कागदोपत्रीच पोहचली आहे,पाणी मात्र पोहचलेच नाही.या पाड्यांची एकूण १३० पेक्षा अधिक लोकसंख्या आहे. हेंद्र्यापाडा हा  बिलगाव ग्रामपंचायतीतील आहे. जलजीवन मिशन योजनेंतर्गत हेंद्र्यापाडा  येथे ही योजना पोहचलीच नाही.पाण्याची सोय झाली तर माणसांसाठी व गुरांसाठी प्यायला पाणी मिळेल,अशा अनेक समस्या सुटतील

        तरी जलजीवन मिशन योजनेंतर्गत धडगांव तालुक्यातील  बिलगांव-हेंद्र्यापाडा येथे पाण्याची सुविधा करून द्यावी ,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे.हर घर नल चा दिंडोरा पेटवत सरकार देशभर जनजीवन मिशन योजना राबविण्यात आहे.या योजनेतून प्रत्येक व्यक्तीला शुद्ध पाणी प्यायला मिळाले पाहिजे,प्रत्येक घरात शुद्ध पाणी पोहचवणे हा मुख्य  उद्देश असला तरी बिलगांव हेंद्र्यापाडा सारख्या आदिवासी  दुर्गम भागात जलजीवन मिशन योजना नुसती कागदोपत्रीच पोहचली आहे.

Post a Comment

0 Comments