Type Here to Get Search Results !

8 ते 14 एप्रिल दरम्यान सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन -सुंदरसिंग वसावे

 8 ते 14 एप्रिल दरम्यान सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन

-सुंदरसिंग वसावे 

                     नंदुरबार, दिनांक 08 एप्रिल, 2025 (जिमाका) :

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, नंदुरबार कार्यालयामार्फत 8 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह’ आयोजित करण्यात आला असून या सप्ताहात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याचे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी एका शाासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.


8 एप्रिल रोजी या सप्ताहाचे उद्घाटन भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या वाचनाने करण्यात आले असून  सप्ताहादरम्यान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा व्याख्यान, रक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान तसेच शासकीय योजनांची प्रचार प्रसिद्धी असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.  14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून सप्ताहाचे समारोप करण्यात येणार आहे.


या सप्ताहात नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही सहाय्यक आयुक्त श्री. वसावे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.


Post a Comment

0 Comments