Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री यांच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत ई-ऑफिस प्रणालीचे प्रशिक्षण व अंमलबजावणी

 मुख्यमंत्री यांच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत ई-ऑफिस प्रणालीचे प्रशिक्षण व अंमलबजावणी 


नगर परिषद नंदुरबार कार्यालयात ई-ऑफिस प्रणाली सुरु करण्यासाठी एक विशेष प्रशिक्षण सत्र घेण्यात आले.


या प्रशिक्षणात जयेश खैरनार, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक, माहिती व तंत्रज्ञान कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार यांनी ई-ऑफिसद्वारे फाईलचा प्रवास सुरवातीपासून शेवटपर्यंत कसा होतो याचे प्रात्यक्षिक सादर केले.

या उपक्रमाचा उद्देश सर्व शासकीय कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान आणि कागदविरहीत करणे आहे.

प्रशिक्षणार्थींना भविष्यातील सर्व कामकाज ई-ऑफिस प्रणालीद्वारे करण्याच्या सूचना देण्यात आल्या.



Post a Comment

0 Comments