Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

शिवसेना तळोदा कार्यालयाचे उद्घाटन आणि आमदारांचा सन्मान सोहळा

 शिवसेना तळोदा कार्यालयाचे उद्घाटन आणि आमदारांचा सन्मान सोहळा

                तळोदा : येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उ‌द्घाटन समारंभ व भव्य नागरी सत्कार सोहळा शुक्रवार, दि. 11 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता विद्युत वितरण विभागाचा कार्यालय शेजारी, शहादा रोडवरील कार्यालयात संपन्न होणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन तळोदा शिवसेनेचा वतीने करण्यात आले आहे.


                        कार्यक्रमाचे उ‌द्घाटन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सदस्य आ. चंद्रकांत रघुवंशी उपस्थित राहणार आहेत.

                        प्रमुख अतिथी म्हणून आमदार आमश्या पाडवी (अक्राणी/अक्कलकुवा), सहसंपर्कप्रमुख लक्ष्मण वाडीले (अक्कलकुवा-धडगाव-तळोदा), जिल्हाप्रमुख अॅड. रामरघुवंशी व गणेश पराडके यांची उपस्थिती लाभणार आहे.


नवनीर्वाचित आमदार चंद्रकांत रघुवंशी व आमश्या पाडवी यांचा यावेळी भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. सर्व शिवसैनिकांनी व नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन शिवसेना तळोदा शाखेच्यावतीने करण्यात येत आहे....

Post a Comment

0 Comments