विविध तीन गुन्ह्यातील जप्त केलेला विमल गुटखाचा साठा जळून नष्ट ; तळोदा पोलिसांची कारवाई
तळोदा पोलीस ठाणे अंतर्गत तीन गुन्ह्यातील जप्त केलेला सुमारे 6 लाख 2 हजार 376 रुपये किमतीच्या विमल गुटखाचा साठा जाळून नष्ट केल्याची कारवाई तळोदा पोलिसांतर्फे करण्यात आले.
मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून 100 दिवस कृती आराखडा नुसार पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस, अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी दर्शन दुगड, यांच्या मार्गदर्शनाखाली तळोदा पोलीस ठाणे अंतर्गत विविध तीन गुन्ह्यात विमल गुटखा साठा जप्त केला होता. एफडीआय चे अधिकारी बाविस्कर यांच्या सक्षम जप्त केलेला सहा लाख 2 हजार 376 रुपयाच्या विमल गुटखाचा साठा जाळून नष्ट केल्यास ची कारवाई तळोदा सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू लोखंडे व सक्षम अधिकारी पोलीस व होमगार्ड कर्मचारी यांच्या उपस्थिती केली.
Post a Comment
0 Comments