Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना; 13 एप्रिलला ज्येष्ठ नागरिकांसाठी अयोध्येला तीर्थ यात्रा निघणार सुंदरसिंग वसावे

 मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना;

13 एप्रिलला ज्येष्ठ नागरिकांसाठी अयोध्येला तीर्थ यात्रा निघणार

सुंदरसिंग वसावे

नंदुरबार, दिनांक 09 एप्रिल, 2025 (जिमाका) :

‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन’ योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 800 पात्र लाभार्थ्यांची निवड झाली असून 13 एप्रिल 2025 रोजी अयोध्या येथील श्रीराम मंदिर येथे तीर्थयात्रा निघणार आहे. या तीर्थदर्शन यात्रेस नंदुरबार रेल्वे स्थानक येथून सकाळी 10.00 वाजता हिरवा झेंडा दाखविला जाणार असल्याचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.


सर्वधर्मीयांमधील वय 60 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे. या योजनेत श्रीराम मंदिर (अयोध्या) येथे जाण्यासाठी निवड झालेल्या जिल्ह्यातील प्रवाशांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, नंदुरबार येथील सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तसेच   निवड झालेल्या प्रवाशांना दूरध्वनीद्वारेही कळविण्यात येणार आहे. यादीमध्ये पात्र लाभार्थ्यांनी प्रवासासाठी सक्षम शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांचे 15 दिवसांपेक्षा जास्त जुने नसलेले वैद्यकीय प्रमाणपत्र व आधारकार्डसह 13 एप्रिल 2025 रोजी सकाळी 9 वाजता नंदुरबार रेल्वे स्टेशन येथे उपस्थित राहावे, असे आवाहनही समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्री. वसावे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.



Post a Comment

0 Comments