Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

स्टेम स्पार्क लॅबचे तलावडी आश्रमशाळेत उद्घाटन - अमेरिकेन इंडिया फाउंडेशन चा उपक्रम

 स्टेम स्पार्क लॅबचे तलावडी आश्रमशाळेत उद्घाटन                   अमेरिकेन इंडिया फाउंडेशन चा उपक्रम

                     तळोदा :-    पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचलित अनुदानित आश्रमशाळा तलावडी येथे अमेरिकेन इंडिया फाउंडेशन अंतर्गत स्टेम स्पार्क लॅबचे उद्घाटन करण्यात आले.

       


          कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी के सी. कोकणी हे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे समन्वयक  रोहन नटावदकर, स्टेम एक्स्पर्ट हेमंत पालीवाल, आश्रमशाळेचे माध्यमिक मुख्याध्यापक प्रकाश साळुंखे तसेच प्राथमिक मुख्याध्यापक संजीवन पवार हे उपस्थित होते.

अमेरिकन इंडिया फाऊंडेशन अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात तीन स्टेम लॅब उभारण्यात आलेल्या असून शासकीय मुलींची आश्रमशाळा मांडवी, तसेच शासकीय आश्रमशाळा डाब याठिकाणी लॅब असून नंदुरबार जिल्ह्यातील तलावडी ही एकमेव अनुदानित आश्रमशाळा आहे जेथे स्टेम लॅब उभारण्यात आली आहे.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात स्टेम एक्स्पर्ट हेमंत पालीवाल यांनी वैज्ञानिक प्रयोग, रासायनिक प्रयोग मुलांना हाताळता यावेत, विज्ञान व गणित विषयांबद्दल गोडी निर्माण व्हावी, नवनवीन संकल्पना समजून घेऊन सृजनशीलता निर्माण व्हावी हाच हेतू असल्याचे मत व्यक्त केले.

सहाय्यक प्रकल्प अधिकारी के. सी. कोकणी यांच्या हस्ते फीत कापून स्टेम लॅबचे उद्घाटन करण्यात आले.

या स्टेम लॅब मधे एकूण ११८ प्रयोग सादरीकरणाची सामग्री आहे. या स्टेम लॅबच्या सहाय्याने ड्रोन, इलेक्ट्रिक कार विद्यार्थ्यांना तयार करता येतील. तसेच फायर सेंसर, तसेच सुरक्षा विषयक विविध सेंसर चा उपयोग शिकता येईल. थ्रीडी प्रिंटर चा वापर करून वेगवेगळ्या कलाकृती प्रिंटरच्या साह्याने तयार करता येतील.अत्याधुनिक  रिफ्लेंक्टिंग टेलिस्कोप च्या साह्याने अवकाशातील निरीक्षणे करता येतील. विज्ञान विभाग प्रमुख श्रीमती बबिता गावित यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात कोकणी यांनी अत्याधुनिक लॅबच्या सहाय्याने विद्यार्थ्यांमध्ये  वैज्ञानिक दृष्टिकोन रूजविण्यास मदत होईल असे मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक महेंद्र मनवर यांनी केले. आभार प्रदर्शन विजय पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमेरिकन इंडिया फाउंडेशनचे प्रकल्प समन्वयक विजय पाटील, स्वयंसेवक भावेश शिरसाठ, कृष्णा भदाणे, मनोज पाटील, अनिल पाटील, नेहा शिंदे , सचिन पावरा यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments