Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अंधश्रद्धा निर्मूलन समितीची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

 अंधश्रद्धा निर्मूलन समितीची जिल्हा कार्यकारिणी जाहीर 



तळोदा : शहीद डॉ नरेंद दाभोळकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नंदुरबार जिल्हा प्रेरणा उत्साहात पार पडला. यावेळीसर्वानुमते पुढील दोन वर्षांसाठी जिल्हा कार्यकारिणी निवड करण्यात आली जिल्हाध्यक्षपदी हैदर अली नुरानी यांची तर जिल्हा कार्याध्यक्षपदी वसंत वळवी नंदुरबार यांची निवड करण्यात आली आहे.


          महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा प्रेरणा मेळावा शहादा येथील कुलकर्णी हॉस्पिटलच्या सभागृहात पार पडला या मेळाव्याला जिल्ह्यातील शहादा,तळोदा, नंदुरबार,अक्कलकुवा, मोलगी,कळंबू, आडगाव,प्रकाशा,विसरवाडी,नवापूर, कोठडा येथील शाखांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

       मेळाव्याच्या सुरुवातीला जिल्ह्यातील संघटनात्मक कामाच्या आढावा घेण्यात आला. त्यानुसार शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी शाखेच्या कामाच्या अहवालाचे सादरीकरण केले. त्यानंतर जिल्ह्यातील पुढील चार महिन्याच्या कामकाजाचे नियोजन व चर्चा घेण्यात आली. 

               दुसऱ्या सत्रात जिल्हा कार्यकारणी निवड प्रक्रिया राबवण्यात आली यासाठी राज्य सरचिटणीस विनायक सावळे व राज्य सोशल मीडिया कार्यवाह किर्तीवर्धन तायडे निरीक्षक म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी मावळते जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील यांनी आपल्या मागील कार्यकाळातील महत्त्वपूर्ण बाबींना उजाळा दिला व जिल्ह्यातील सर्व शाखांचे सहकार्य मिळाल्याबद्दल आभार पर मनोगत व्यक्त केले. 

       यावेळी गठीत करण्यात आलेल्या नूतन कार्यकारीणीचा अध्यक्षपदी हैदर अली नुराणी (शहादा) यांची सर्वानुमते पूर्ननिवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी डॉ. डी. बी.शेंडे (तळोदा),डॉ. सी. डी. महाजन (नंदूरबार)

 डॉ. ए.जी.जयस्वाल(नवापूर)प्रा.केशव पावरा,(धडगाव) यांची निवड करण्यात आली. जिल्हा कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी वसंत आत्माराम वळवी (नंदुरबार) यांच्याकडे तर जिल्हा प्रधान सचिवपदी रायसिंग हाण्या पाडवी (मोलगी), व मुकेश कापुरे यांची निवड करण्यात आली. उर्वरित जिल्हा कार्यकारिणीत बुवाबाजी विरोधी संघर्ष विभाग कार्यवाहपदी प्रदीप  केदारे,विविध उपक्रम विभाग भारती पवार,महिला सहभाग विभाग सुमित्रा वसावे,युवा सहभाग विभाग शितल वसावे,जातपंचायत मूठमाती अभियान विभाग प्रा.प्रशांत बोबळे,प्रशिक्षण  विभाग रवींद्र पी.पाटील,मानसिक आरोग्य व्यवस्थापन विभाग,फिरोज खान,सोशल मीडिया व्यवस्थापन विभाग संदिपकुमार आखाडे यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली.


Post a Comment

0 Comments