Type Here to Get Search Results !

खासदार रामजीलाल सुमन यांच्यावर कठोर कारवाई करून खासदारकी रद्द करावी अशी मागणी नंदुरबार जिल्हा सकल राजपूत समाजाच्यावतीने निवेदन

 खासदार रामजीलाल सुमन यांच्यावर कठोर कारवाई करून खासदारकी रद्द करावी अशी मागणी नंदुरबार जिल्हा सकल राजपूत समाजाच्यावतीने निवेदन

नंदुरबार :- 

महाराणा संग्रामसिंग उर्फ राणा सांगा यांच्या विषयी संसदेत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या समाजवादी पार्टीचे खासदार रामजीलाल सुमन यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांची खासदारकी रद्द करावी अशी मागणी नंदुरबार जिल्हा सकल राजपूत समाजाच्या वतीने करण्यात आली. यावेळी निषेध व्यक्त केला.

              याबाबत दिल्ली राज्यसभेच्या सभापती यांना नंदुरबार जिल्हाधिकारी यांच्याद्वारे निवेदनात  म्हटले आहे की, महाराणा संग्रामसिंग उर्फ राणा सांगा यांच्या बद्दल समाजवादी पार्टीचे राज्यसभा खासदार रामलाल सुमन यांनी संसदेत अपशब्द बोलून आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. रामजीलाल सुमन यांच्यावर कठोर कार्यवाही व्हावी तसेच त्यांची खासदारकी रद्द करण्यात येऊन, त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा येत्या काळात राजपूत समाजाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा ईशारा निवेदनातून राजपूत करणीसेनेचे जिल्हाध्यक्ष श्याम राजपूत (मोड), मोहिनीराज राजपूत (नंदुरबार), सुरतसिंग राजपूत (प्रतापपूर), कांतीलाल राजपूत, राकेश राजपूत, डॉ. रामसिंग राजपूत (बोरद), भीमसिंग राजपूत, दिनकर राजपूत, प्रतापसिंग राजपूत, भोजेसिंग राजपूत आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments