Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

47 वी जुनियर गर्ल्स राष्ट्रीय पातळी हँडबॉल अजिंक्यपद स्पर्धा महाराष्ट्राच्या मुलींच्या संघास कास्यपदक प्राप्त

47 वी जुनियर गर्ल्स राष्ट्रीय पातळी हँडबॉल अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघास कास्यपदक प्राप्त 



दि. 26 ते 30 मार्च 2025 दरम्यान लखनऊ येथे 47 वी जुनियर गर्ल्स राष्ट्रीय पातळी हँडबॉल अजिंक्यपद स्पर्धा पार पडली. त्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या मुलींच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी पार पाडत राष्ट्रीय पातळीवर कास्य पदक प्राप्त केले. या स्पर्धेत पहिला सामना महाराष्ट्र विरुद्ध गुजरात कॅस्टल या एकतर्फी सामन्यात महाराष्ट्राच्या संघाने 21 विरुद्ध 04 अशी गुजरातच्या संघावर मात केली , दुसरा सामना महाराष्ट्र विरुद्ध पंजाब या चुरशीच्या सामन्यात 19 विरुद्ध 15 अशी महाराष्ट्राच्या संघाने पंजाब वर विजय संपादन केला व अटीतटीचा सामना जिंकला, तिसरा सामना महाराष्ट्र विरुद्ध आंध्र प्रदेश यांच्यात झाला यात 21 विरुद्ध 08 अशा गोलनी महाराष्ट्राचा संघ विजयी झाला अत्यंत महत्त्वाच्या सामना महाराष्ट्र विरुद्ध हरियाणा या राज्यांमध्ये झाला यात हरियाणाच्या संघाचा महाराष्ट्राच्या संघाने दोन गोलने पराभव करीत आपली विजय पताका पुढे फडकवीत ठेवली. शेवटी महाराष्ट्र विरुद्ध उत्तर प्रदेश यात महाराष्ट्राचा चार गोलने पराभूत झाला व आपल्या महाराष्ट्राच्या मुलींच्या संघास कास्यपदक प्राप्त झाले.

राष्ट्रीय पातळीवरील महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने कांस्यपदक प्राप्त केले या संघास आंतरराष्ट्रीय खेळाडू व सध्याच्या वेळी भारताच्या हवाई दलात कार्यरत असलेले कुणाल सुर्वे यांचे मार्गदर्शन लाभले. व श्रीमती जयश्रीताई यांनी संघ व्यवस्थापक म्हणून काम बघितले तसेच संघाच्या यशस्वीते बद्दल हँडबॉल असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्रजी गायकवाड, हँडबॉल असोसिएशन महाराष्ट्राचे महासचिव राजारामजी राऊत, व हँडबॉल असोसिएशन इंडियाचे सहसचिव व शिव छञपती पुरस्कार विजेते रुपेश जी मोरे यांनी अभिनंदन केले व भविष्यात महाराष्ट्र संघ अशीच कामगीरी करत राहील असा विश्वास दिला.

Post a Comment

0 Comments