Type Here to Get Search Results !

रेवानगर येथील नवीन 33/11 केव्ही सबस्टेशनचे लोकार्पण आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते संपन्न

 रेवानगर येथील नवीन 33/11 केव्ही सबस्टेशनचे लोकार्पण आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते संपन्न 

                  तळोदा तालुक्यातील रेवानगर येथील नवीन 33/11 केव्ही सबस्टेशनचे लोकार्पण आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करून  सबस्टेशन मधून विज पूरवठा सुरू करण्यात आला.

                                      शहादा व तलोदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वारंवार आलेल्या तक्रारी  व समस्या लक्ष्यात घेवून आमदार राजेश पाडवी यांनी महावितरण च्या अभियंता सोबत  शेतकऱ्यांच्या बैठका लावल्या त्या बैठका नुसार विज प्रणाली व सबस्टेशन ची माहिती मागणी नुसार  महावितंरण कड़े  22 मार्च 2021 रोजी ऑनलाईन प्रणाली द्वारे  एकुण नवीन 8 नवे सबस्टेशन ची मागणी केली. त्यात रेवानगर, मोठा धनपुर,  चाँदशैली, रामपूर, गनोर, बामखेड़ा, कळबु, मामाचे मोहिदा, तसेच मतदार संघातील 7 जून्या सबस्टेशन ला नवीन जास्तीचा पॉवर ट्रांसफॉर्मर बसूवून सबस्टेशन ची कैपेसिटी वाढवन्यासाठी देखील मागणी करून वारवार मुख्य कार्यालय मुबई येथे पाठपुरावा केला. 

                          नवीन सबस्टेशन उभारानी केली. व जुन्या सबस्टेशन ची क्षमता वाढवली तर पुढील 30 वर्षा ची विजेची मागणी व कमी दाबाच्या विज पुरवठा ची समस्या सूटेल शहादा -तळोदा मतदार संघात औद्योगिक व शेतशिवारा च्या होणारी मागणी व तरुण पिढीला सक्षम विज पुरवठा मिळावा याचा दृष्टिकोण लक्ष्यात घेवून आमदार राजेश पाडवी यानी मार्च 2021 ला विज सबस्टेशन, लाईनीच नियोजन केले होते. राज्यात भाजपाची सत्ता येताच कामाना गति मिळाली असून,  मागील 15 वर्षा पासून रखडलेले काम मार्गी लावून परिसरातील गावाच्या शेत शिवाराच्या विजेच्या समस्या सोडविल्या आहेत.


मोठा धनपूर सबस्टेशन च काम पुढील आठवड्यात सुरु होणार आहे व उर्वरित सर्व काम लवकरच मार्गी लागणार आहेत त्यासाठी योग्य तो सर्व  पाठपुरावा आमदार राजेश पाडवी यानी केला असून. विज प्रशासन व ऊर्जा विभाग त्यासाठी तात्काळ कार्यवाही करत आहे.

रेवानगर येथे सबस्टेशन सुरु झाल्याने तालुक्यातील तलावडी , सोमावल सबस्टेशन च्या लोढ कमी होऊन 20 गावांच्या विजेच्या समस्या सुटणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

         याप्रसंगी महावितरण चे उपविभागीय अधिकारी तिरुपती पाटील व त्यांच्या सर्व टिम च कामाच कौतुक पाडवी यांनी केले आहे.लवकरच उर्वरित सर्व सबस्टेशन कामे तात्काळ सुरू करण्याच्या सूचना देखील आमदार राजेश पाडवी यांनी विज प्रशासनाला दिल्या आहेत त्यासाठी सर्व पाठपुरावा करण्यात आला असून सर्व कामे मुदतीच्या आत पूर्ण होतील. अशे आ राजेश पाडवी यांनी शेतकऱ्यांना आश्वासित केले आहे. सबस्टेशन ची मंजुरी घेऊन काम मार्गी लावल्याने आमदार राजेश पाडवी यांच भविष्यातील 30 वर्ष च नियोजन व शेतकऱ्याना दिलेल आश्वासन पूर्ण केल्याने शहादा तळोदा तालुक्यात समाधानाचे वातावरण आहे.

Post a Comment

0 Comments