Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

रोहयो समितीच्या सदस्यपदी आमदार आमश्या पाडवी व आमदार शिरीष नाईक यांची नियुक्ती

रोहयो समितीच्या सदस्यपदी आमदार आमश्या पाडवी व आमदार शिरीष नाईक यांची नियुक्ती

रोहयो समितीच्या सदस्यपदी आमदार आमश्या पाडवी व आमदार शिरीष नाईक यांची नियुक्ती

अक्कलकुवा /प्रतिनिधी

अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या फुलजी पाडवी यांची महाराष्ट्र विधिमंडळ रोजगार हमी योजनेच्या समितीच्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा सचिव जितेंद्र भोळे यांच्या स्वाक्षरीने आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. रोजगार हमी योजना समितीच्या प्रमुख पदी आमदार सुनील शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर सदस्य पदी अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या पाडवी त्यांच्यासह नवापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीषकुमार नाईक यांची ही निवड झाली आहे. यांच्या नियुक्तीने ग्रामीण भागातील तसेच आदिवासी बांधवांना रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणींना चालना मिळणार आहे अशी अपेक्षा करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments