तळोदा तालुक्यात ज्येष्ठांची आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.
तीनशे ज्येष्ठांची आरोग्य तपासणी, शुभम चौधरी यांच्या उपक्रम
तळोदा : - आरोग्यदूत आमदार राजेश पाडवी यांच्या प्रयत्नातून केंद्र सरकारच्या जनकल्याणकारी योजनांच्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांच्या सुदृढ़ आरोग्यासाठी "राष्ट्रीय वयोश्री योजना व केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र" यांच्या मार्फत मुंबई व कानपूर येथील तज्ञ डॉक्टर यांच्या उपस्थित
६० वर्षे व त्या वरील जेष्ठ नागरिकांची व महिलांची अनुक्रमे १५,१६,१७ व १८ नोव्हेंबर रोजी तळोदा तालुक्यातील धानोरा, मोरवड, छोटाधनपूर व कढेल या गावात सामाजिक कार्यकर्ते व भारतीय जनता पक्षाचे तालुका सरचिटणीस इंजि. शुभम संजीव चौधरी यांच्या मार्फत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले.
या शिबितात एकुण जवळपास ३०० हून अधीक लोकांची तपासणी करुन त्यांना राष्ट्रीय वयोश्री योजना व केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र यांच्या मार्फत आवश्यक त्या साहित्याचे वाटप येत्या काही दिवसात करण्यात येणार आहे. तसेच या शिबिराला जितेंद्र पाडवी व सरपंच दशरथ ठाकरे, प्रवीण वळवी, संजय वळवी व प्रमिला मवाशी आदी मान्यवरांनी उपस्थितीत होते.
शिबिरे यशस्वितेसाठी जितेंद्र पाटील, सीताराम पाटील, भूषण पाटील, उमेश पाटील, विवेक चौधरी, वैभव चौधरी, अतुल पाटील, रणजीत चौधरी, संतोष ठाकरे, संजय वळवी, मगन पाडवी, योगेश पाडवी, तुकाराम पाटील, गणेश पाटील , भुवेश पाटील, समर्थ पाटील,मेहुल पाटील यांनी परिश्रम घेतले.




Post a Comment
0 Comments