अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचा मदतीचा हात
नंदुरबार |प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतीपिकांचे झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकारतर्फे पीडित शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला जात असून, समाजातील विविध संस्था आणि संघटनादेखील या कार्यात पुढाकार घेत आहेत.
याच पार्श्वभूमीवर बहुभाषिक ब्राह्मण महासंघ, नंदुरबार यांनी पुढे येत संवेदनशीलता दाखवली आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्यांनी ₹11,001/- इतकी देणगी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे सुपूर्द केली.
हा धनादेश मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते स्वीकृत करण्यात आला. शेतकऱ्यांच्या संकटसमयी समाजातील संस्थांनी पुढाकार घेणे ही अत्यंत प्रेरणादायी बाब असल्याचे मत जिल्हाधिकारी महोद्यांनी व्यक्त केले.
या योगदानामुळे संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून अशा प्रकारच्या मदतकार्यामध्ये सहभागी होणाऱ्या सर्वांचे जिल्हा प्रशासनाने मनःपूर्वक आभार मानले आहेत.
नंदुरबार जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असून, सर्वसमावेशक मदतपद्धतीद्वारे शेतकऱ्यांना शक्य ती मदत दिली जाईल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.


Post a Comment
0 Comments