Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

तळोदा, नंदुरबार नगरपरिषद निवडणूक तयारीसंदर्भात सुरक्षा कक्ष व मतदान केंद्रांची तपासणी

 तळोदा व नंदुरबार नगरपरिषद निवडणूक तयारीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट, सुरक्षा कक्ष व मतदान केंद्रांची तपासणी

तळोदा : - 

नंदुरबार जिल्हाधिकारी नंदुरबार आणि  पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली तळोदा व नंदुरबार नगरपरिषद निवडणूक–2025 साठी सुरक्षाव्यवस्था, मतदान केंद्रांची तयारी व Strong Room ची पाहणी करण्यात आली. 

निवडणूक प्रक्रिया सुरक्षित, सुरळीत आणि निर्विघ्न पार पडावी यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत.

तळोदा येथील सुरक्षा कक्ष (Strong Room) तसेच नंदुरबार येथील सुरक्षा कक्षाची संपूर्ण तपासणी करण्यात आली. सुरक्षा यंत्रणा, CCTV व्यवस्था, प्रवेश नियंत्रण आणि पोलिस बंदोबस्त यांची खात्री करण्यात आली.


 मतदान केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी

प्रशासनिक पथकासह मतदान केंद्रांना भेट देऊन खालील निर्देश दिले गेले : मतदान केंद्रांच्या परिसरात पूर्ण स्वच्छता राखणे आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी तातडीची कार्यवाही.


मतदान केंद्रांच्या परिसरात पडलेले दगड, धोंडे, अडथळे त्वरित हटविणे, जेणेकरून मतदारांच्या हालचालीस अडथळा येऊ नये.


मतदानाच्या दिवशी संभाव्य गर्दी नियंत्रणासाठी पूर्वनियोजित उपाययोजना करण्याचे निर्देश.


 पोलीस व प्रशासन सतर्कता पोलीस विभाग आणि स्थानिक प्रशासनाने पूर्ण दक्षता राखावी, संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष देण्याचे आदेश. महावितरणकडून मतदान केंद्रासाठी पूर्ण वेळ तंत्रज्ञाची नेमणूक करण्याचे स्पष्ट निर्देश, जेणेकरून मतदान प्रक्रियेदरम्यान वीजपुरवठा खंडित होणार नाही.


ही तपासणी निवडणुकीतील पारदर्शकता, मतदारांची सुरक्षा आणि प्रशासनाची वचनबद्धता अधोरेखित करते. नंदुरबार जिल्हा प्रशासन सुरक्षित, सुसूत्र आणि शिस्तबद्ध निवडणूक प्रक्रिया राबविण्यास पूर्णतः कटिबद्ध आहे.

Post a Comment

0 Comments