Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

तळोदा नगर परिषद निवडणूक : माघारी अंती चित्र स्पष्ट ; नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढत तर बहु संख्य प्रभागात तिरंगी लढत रंगणार

तळोदा नगर परिषद निवडणूक : माघारी अंती चित्र स्पष्ट 

नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढत तर बहु संख्य प्रभागात तिरंगी लढत रंगणार


तळोदा / सप्त नगरी न्युज ब्युरो 

तळोदा नगर परिषद निवडणुकीसाठी  उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटच्या मुदतीपर्यंत गुरवारी नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार योगेश चौधरी, तर नगरसेवक पदाचे दोन उमेदवारांनी माघार तर शुक्रवारी नगराध्यक्षपदाचे डॉ. शशिकांत वाणी, अजय परदेशी, यांनी आपली उमेदवारी अर्ज माघारी घेतली आहे.  एकूण तीन उमेदवारांनी आपली उमेदवारी माघार घेतली असल्याने निवडणूक रिंगणात भाग्यश्री योगेश चौधरी (राष्ट्रवादी), जितेंद्र लक्ष्मण सूर्यवंशी (भाजपा), हितेंद्र सरवरसिंग क्षत्रिय (शिवसेना) सय्यद तौकीर सय्यद रईस अली (अपक्ष) हे निवडणूक रिंगणात राहणार आहे.


नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत असली तरी अत्यंत चुरशीची तिरंगी लढत रंगणार आहे.


प्रभाग निहाय लढती अशा होणार

प्रभाग निहाय उमेदवार असे प्रभाग एक - अ मध्ये तिरंगी लढत असून यात  रामानंद शिरीषकुमार ठाकरे (राष्ट्रवादी), योगेश अरविंद पाडवी (भाजपा), तर  विनोद दिलवरसिंग माळी (शिवसेना), यांच्या लढत रंगणार आहे.

प्रभाग दोन ब मध्ये तिरंगी लढत असून  भाग्यश्री योगेश चौधरी (राष्ट्रवादी),  गायत्री हितेंद्र खाटीक (शिवसेना),  कलुबाई संजय भरवाड ( भाजपा) यांच्या लढत होईल.

प्रभाग दोन अ मध्ये तिरंगी लढत असून  डामरे हेमलता विलास (भाजपा),  पाडवी तनुजा नरेश (शिवसेना),  पाडवी शितल लक्ष्मण (राष्ट्रवादी )या उमेदवार लढत होईल.

प्रभाग दोन ब मध्ये तिरंगी लढत असून सानिया कलीम अन्सारी (बीजेपी), चौधरी रूपाली यश (राष्ट्रवादी), परदेसी अनिता संदीप (शिवसेना) यांच्या लढत रंगणार आहे.

प्रभाग दोन क मध्ये चौरंगी लढत असून खाटीक इमरान मेहमूद (राष्ट्रवादी), विकास सरवनसिंग क्षत्रिय (शिवसेना), चौधरी कैलास प्रभाकर (भाजपा), सय्यद इद्रेस अली अब्बास (एम.आय.एम) यांच्या लढत होईल

प्रभाग तीन अ मध्ये चौरंगी लढत असून पवार अरुणा भरत (काँग्रेस), पिंपळे सिंधुबाई उद्धव (राष्ट्रवादी), जयश्री हंसराज महाले (भाजपा), क्षत्रिय शोभा केसरसिंग (शिवसेना) यांच्या लढत रंगणार आहे.

प्रभाग तीन ब मध्ये चौरंगी लढत असून गोसावी विकासगीर झूलालगीर (शिवसेना), अजय छबुलाल परदेशी (भाजप), महाले विकास सुरेश (राष्ट्रवादी), भूषण दीपक क्षत्रिय (अपक्ष) यांच्यात अपक्षने आव्हान उभे केले आहे.

प्रभाग चार अ मध्ये तिरंगी लढत असून पाडवी कल्पना सुखदेव (शिवसेना), पाडवी प्रतिभा दीपक (राष्ट्रवादी), पाडवी वसूबाई विजयसिंग (बीजेपी) यांच्यात लढत होणार आहे.


प्रभाग चार ब मध्ये तिरंगी लढत असून कुरेशी शेख रईस शेख लुकमान (बीजेपी), जोहरी अमन मोहन (राष्ट्रवादी), शेख नदीम शेख युनिस (शिवसेना) यांच्यात लढत होईल.


प्रभाग पाच अ  मध्ये तिरंगी लढत असून कल्पेश जगदीश चौधरी (राष्ट्रवादी), भोई जगदीश भगवान (शिवसेना), सोनार आनंद महिंद्र (भाजपा) यांच्यात लढत होणार आहे.

प्रभाग पाच ब मध्ये तिरंगी लढत असून दुबे प्रतीक्षा जितेंद्र (शिवसेना), भोई रत्ना हिरालाल (राष्ट्रवादी), भोई हेतल किशोर (भाजपा) यांच्यात लढत रंगणार आहे. 

प्रभाग सहा अ मध्ये चौरंगी लढत असून प्रकांत प्रकाश ठाकरे (काँग्रेस), पाडवी धनराज योगेश (शिवसेना), पाडवी सुरेश महादू (भाजपा), पाडवी हर्षाबाई मनोज (राष्ट्रवादी) यांच्यात लढत रंगणार आहे.

प्रभाग सहा ब मध्ये तिरंगी लढत असून पिंपरे गायत्री अरुण (राष्ट्रवादी), शेंडे अंबिका राहुल (भाजपा), सूर्यवंशी मनीषा राजेंद्र (शिवसेना) यांच्या लढत होईल.

प्रभाग सात अ मध्ये तिरंगी लढत असून चौधरी दीपक जीवन (राष्ट्रवादी), माळी शिरीष कुमार नथ्थु (भाजपा), राणे गणेश लिंबा (शिवसेना) यांच्यात लढत रंगणार आहे. 

प्रभाग सात ब मध्ये तिरंगी लढत असून उदासी सयना अनुपकुमार (शिवसेना), चौधरी रजनीबाई कांतीलाल (राष्ट्रवादी), रत्ना सुभाष चौधरी  (भाजपा) यांच्या लढत होईल.

प्रभाग आठ अ मध्ये चौरंगी लढत असून नाईक लक्ष्मी विजय (राष्ट्रवादी) , पाडवी आरती सुनील (शिवसेना), पाडवी जमुनाबाई ईश्वर (भाजपा), पाडवी पुनम आकाश (काँग्रेस) यांच्यात लढत होईल. 

प्रभाग आठ ब मध्ये सरळ लढत असून उदासी अनुपकुमार रवींद्र (शिवसेना), पटेल संजय श्रीपत (भाजपा) यांच्यात लक्षवेधी लढत रंगणार आहे. 

प्रभाग नऊ अ मध्ये सरळ लढत असून माळी मोनिका सुरत (शिवसेना), राणे सुवर्णा पंकज (भाजपा) यांच्या लढत होईल.  

प्रभाग नऊ ब मध्ये सरळ लढत असून कर्णकार कपिल सुनील (शिवसेना), वाणी गौरव देवेंद्रलाल (भाजपा) यांच्यात लढत रंगणार आहे.

प्रभाग दहा अ मध्ये तिरंगी लढत असून पाडवी नरेश हरी (शिवसेना), पाडवी विवेक लक्ष्मण (भाजपा), प्रधान अरविंद बबन (राष्ट्रवादी) यांच्यात लढत होणार आहे.

प्रभाग दहा ब  मध्ये तिरंगी लढत असून कोळी मीराबाई राजू (राष्ट्रवादी), चव्हाण वैशाली अंबालाल (शिवसेना), माळी अपर्णा संजय (भाजपा) यांच्यात लढत होईल. असे निवडणूक लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

विविध प्रभागात नऊ उमेदवारांनी अर्ज माघार घेतली आहे. प्रभाग निहाय माघार घेतलेले उमेदवार असे. प्रभाग क्र. 2 अ. मधून क्षत्रिय सुनीता विजय यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता त्यांनी माघार घेतला आहे.

  प्रभाग तीन अ मधून मनीषा राजेंद्र बिरारे अपक्ष यांनी माघार घेतला आहे. 

प्रभाग 3 ब मधून सुनील नामदेव मराठे अपक्ष व निमेशचंद्र मगनलाल माळी अपक्ष, भूषण रमेश येवले अपक्ष, यांनी माघार घेतला आहे, 

प्रभाग 5 अ मध्ये शेख अक्रम इंद्रेस अपक्ष माघार.

प्रभाग 5 ब शोभाबाई जालंदर भोई अपक्ष माघार..

प्रभाग 7 अ सुतार गोकुळ बन्सी अपक्ष माघार

 प्रभाग 9 ब गिरणार देवेंद्र जयवंत उ.बा.ठा माघार

Post a Comment

0 Comments