Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

मोंटेक्स बॉल क्रिकेट तळोदा येथील एस.ए.मिशन इंग्लिश मीडियम स्कूल चे खेळाडूंचा द्वितीय क्रमांक पटकाविला

मोंटेक्स बॉल क्रिकेट तळोदा येथील एस.ए.मिशन इंग्लिश मीडियम स्कूल चे खेळाडूंचा द्वितीय क्रमांक पटकाविला 

 तळोदा :- मोंटेक्स बॉल क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र यांच्या मान्यतेने आयोजित जिल्हास्तरीय माँटेक्स बॉल क्रिकेट स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल नंदुरबार येथे आयोजित करण्यात आली होती , या स्पर्धेत तळोदा येथील एस.ए.मिशन इंग्लिश मीडियम स्कूल चे खेळाडूंनी सहभाग नोंदवून यश मिळवले या स्पर्धेत १४ वर्षा आतील खेळाडूंनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

        या खेळात मॅन ऑफ द मॅच चैतन्य चौधरी ,आदित्य जैन, ललित मराठे,तन्मय मराठे, सुफियान मंडल,सोहम पाडवी,मंथन भामरे , अर्पित वळवी आणि १२ वर्षा आतील खेळाडू अक्षत इंगळे,विपुल झीपरे, प्रणय महाले,गुरु पाटील, मरूफ सय्यद, अनुराग पाडवी, नक्ष पाटील,पृथ्वीराज गिरासे या खेळाडूंनी तृतीय क्रमांक पटकावून उत्कृष्ट कामगिरी केली . या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक सत्यजित नाईक यांनी यशस्वी खेळाडूंना अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक एस.आर.कर्मा यांचे मार्गदर्शन लाभले .शिक्षक वृंद नीळकंठ सूर्यवंशी, विशाल पाडवी उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments