कारखाना, खांडसरी व गुऱ्हाळ ऊस दर वाढविण्याची बिरसा आर्मीची मागणी
साखर कारखान्यातही अल्प दर;शेतकरी आर्थिक संकटात
तळोदा : गुऱ्हाळ तयार करण्यासाठी लागणारा ऊस दरात वाढ करण्याची मागणी बिरसा आर्मीने मुख्यमंत्री, कृषिमंत्री, जिल्हाधिकारी यांना तहसीलदार व कृषि अधिकारी तळोदा यांना निवेदनाद्वारे केले. निवेदनात म्हटले आहे की, तळोदा परिसरात १० ते १४ गुऱ्हाळघरे आहेत.गुऱ्हाळ तयार करण्यासाठी परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी गूळ उत्पादक करणाऱ्या व्यवसायिकांना देत असतो. परंतु,गुऱ्हाळ उत्पादक ऊस २१०० ते २२०० दर देत आहे.त्यामुळे परिसरातील ऊस उत्पादकांचे शेतात केलेला खर्चही निघणे मुश्कील आहे.अगोदरच शेतकरी अस्मानी संकटाने आर्थिक संकटात आहे.सरकार आश्वासनाशिवाय काहीही करत नाही.वर्षानुवर्ष नुकसानीचे पंचनामे होतात.परंतु,मदत मात्र शून्य.कोणत्याही पिकाला सरकार हमीभाव देतांनाही दिसून येत नाही.तसेच,दुसऱ्या बाजूला परिसरातील साखर कारखानेही अल्पदर देत असल्याने बळीराजा शेतकरी आर्थिक संकटात आहे. देशाच्या पोशिंदाची किती दिवस लुटमार करणार?असा प्रश्न उपस्थित करत गुऱ्हाळ उत्पादकांनी शेतकऱ्यांसोबत चर्चा करून ऊस दर वाढविण्यात यावा.तसेच,व्यापारी इतर पिकांचेही अल्प दराने खरेदी करतात,त्याकडेही लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी बिरसा आर्मीने केली आहे.बिरसा आर्मी व शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.निवेदनावर जिल्हा सचिव सतीश पाडवी,निरीक्षक सुभाष पाडवी,अक्कलकुवा कार्याध्यक्ष तापसिंग पाडवी,रापापूर -पाल्हाबार शाखाध्यक्ष शिवाजी तडवी,सल्लागार गणेश पाडवी,मोदलपाडा शाखाध्यक्ष रोहिदास वळवी,सुभाष नाईक,ओसी पाडवी आदी.कार्यकर्त्याच्या सह्या आहेत.
'अवकाळी पावसाने शेतकरी आर्थिक संकटात आहे.सरकार आश्वासने देऊन मदत जाहीर करते.पंचनामे होतात.मात्र,मदत शून्य.तसेच,सरकार कोणत्याच पिकाला योग्य हमीभाव देत नाही.खते,बियाणे,औषधे प्रचंड असल्याने केलेला खर्चही शेतातुन निघणे मुश्किल आहे.सरकारने गांभीर्याने विचार करून शेतमालास उत्पादन खर्चावर भाव दिला पाहिजे'.
- राजेंद्र पाडवी,संस्थापक अध्यक्ष बिरसा आर्मी

Post a Comment
0 Comments